सुसंवाद साधावा व विचारांची देवान घेवाण व्हावी. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
▪️निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
सोहम टेलटलिंक प्रा .लि. गेट टु गेदर हा कार्यक्रम हॉटेल मारवल इन शिरूर येथे नुकताच पार पडला . या कार्यक्रमाचा उद्देश कामगार सह कुटुंब सहपरिवार यांचा सुसंवाद साधावा विचारांची देवान घेवाण व्हावी . या उद्देशाने या कार्यकमाचे अयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले . दिप प्रज्वलन चेअरमन डॉ . श्री दादाभाऊ चिखले आदर्श सरपंच सौ.गायत्री चिखले एच आर . डायरेक्टर श्री . राजेंद्र मोरे बिजनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर रवेंद्र जाधव बिजनेस डेव्हलपमेंट अजय कडुकर ठाणे जिल्हा पुढारी पेपरचे उपसंपादक विश्वनाथ नवलू एच आर फायन्स प्रविण पऱ्हाड उपसरपंच मोहन चिखले सोहम चिखले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यांत आले .
यावेळी चेअरमन डॉ . चिखले यांनी आपल्या मनोगतात ‘मी कसा घडलो ‘ या विषयी स्टापला मार्गदर्शन करताना सांगितले . यावेळी ते असेही म्हणाले आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरी आपण खचुन न जाता त्यावर मार्ग काढून पुढे गेले पाहिजे . संकट त्यांनच येतात ज्यांच्या मध्ये संकटाला तोंड देण्याची धमक आहे . तुम्हाला सकंट आले तर तुम्ही स्वःताला खुप भाग्यवान समजा .
यावेळी आदर्श सरपंच गायत्री चिखले यांनीही मनोगत व्यक्त केले . कंपनीचे प्रेजेंटेशन मोनाली मुलुख यांनी केले . यावेळी कार्यक्रमात स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या गेम , संगित खुर्ची , लिंबु चमचा ‘ महिला पुरुष बच्चे कंपनी साठी स्पर्धा ठेवण्यात आल्या तसेच चुमुकल्यानी विविध गाण्यावर डान्स केले .
या स्पर्धांचे नियोजन अजय कडूकर रवेंद्र जाधव यांनी केले होते विजेत्यांना बक्षिस देवून गौरवण्यात आले . हा कार्यक्रम हसत खेळत वातावरणात पार पडला . महिला भगिणिनी विषेश कौतुक केले . यावेळी मोहन चिखले विश्वनाथ नवलू रवेंद्र जाधव संदिप हवलदार यांनी आपली मनोगत मांडले . सुत्रसंचालन पुजा कुलकर्णी यांनी केले तर आभार राजेंद्र मोरे यांनी मानले ..