..गोलेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी पालखी सोहळा
गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ
ता.१४ गोलेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शुक्रवार ता.८ पासून प्रारंभ झाला असून वार शुक्रवार ता.१५ रोजी काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे. ता.८ ह.भ.प नामदेव महाराज साठे ता. ९ गायनाचार्य बापू टेंगले ता.१० तुषार पाबळे ता.११ किरण भागवत ता.१२ निवृत्ती लोखंडे ता.१३ शामसुंदर ढवळे ता.१४ धनंजय देशमुख या महाराजांची किर्तने झाली. ता.१४ दुपारी ३ वाजता गावठाण परिसरातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ग्रामप्रदक्षिणा दिंडी मिरवणूक काढण्यात आली.काल्याचे किर्तन ह.भ.प विकास महाराज देवडे यांचे होणार आहे. कीर्तनात नादब्रम्ह वारकरी गुरुकुल आळंदी अ. नंदराज महाराज पाटील पुर्णत: अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणारी वारकरी संस्था आळंदी या संस्थेतील मुलांनी साथ दिली.
आलेल्या भाविकांसाठी काल्याचा महाप्रसाद सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हू गिरमकर माजी सैनिक सदाशिव भोगावडे माजी सैनिक काशिनाथ भोगावडे याच्या वतीने देण्यात आला.अखंड हरिनाम सप्ताहाचे ३३ वे वर्ष असून यावर्षी अध्यक्ष म्हणून अक्षय वाखारे उपाध्याय मच्छिंद्र कारंडे खजिनदार सचिन वाखारे करण्यात आलेली होती. अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ यानी आयोजन केले होते.