शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
शिरूर तालुक्यातील निर्वी येथे बालेशा क्रिकेट क्लब च्या वतीने निर्वी प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे उद्घाटन वार गुरुवार दि. 31 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाले बालेशा क्रिकेट ग्राऊंड येथे सर्व सामने खेळले जाणार आहे या स्पर्धेचे हे दहावे वर्षे आहेमाजी उपसरपंच दत्तात्रय पवार उद्योजक मारुती पवार युवा उद्योजक नितीन दादा सोनवणे उद्योजक राहुल सोनवणे चेअरमन प्रवीण सोनवणे उद्योजक गणेश पवार या संघमालकांनी आपले संघ मैदानात उतरवले आहे त्यामुळे सामने रंगतदार होणार आहेत.सदर सामन्यांचे नियोजन बालेशा क्रिकेट क्लबने केले आहे त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे खेळाडूंसाठी कुठलेही अडचण येणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी उपसरपंच अनिल कांबळे सर द्वितीय क्रमांकासाठी अल्पसंख्याक अध्यक्ष पापाभाई आतार तृतीय क्रमांकासाठी चेअरमन संपत आबा सोनवणे ट्रॉफी सौजन्य कै. कुंडलिक नाना सोनवणे यांच्या स्मरणार्थ तसेच क्रिकेट साहित्य सौजन्य माजी चेअरमन शरद बापू सोनवणे व व्हाईस चेअरमन रखमा कोळपे तसेच वैयक्तिक अनेक बक्षिस सौजन्य अनेक मान्यवरांनी दिलेले आहे जाहिरातीसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ साळुंके यांनी सौजन्य दिले आहे.
यावेळी पंच सचिन नलगे सर, संतोष सोनवणे सर नाजिम पठाण, तात्या शहाणे ,उपसरपंच अनिल कांबळे सर हे काम पाहणार आहे तसेच समालोचन तुकाराम सोनवणे सर हे करणार आहेत.यावेळी माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, चेअरमन संपत आबा सोनवणे, माजी उपसरपंच दत्ता पवार, माजी चेअरमन रसीकशेट नहार, संचालक विनोद सोनवणे, युवा उद्योजक नितीन दादा सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप भाऊ साळुंके , सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे,युवा उद्योजक अतुल पवार,मेजर दत्ता माळवदकर, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ सोनवणे, उद्योजक विशाल कुल, सामाजिक कार्यकर्ते शफिक पठाण, युवा उद्योजक बालाजी सोनवणे, उद्योजक राहुल वाबळे, प्रमोद राजगुरव,अजय साळुंके ,प्रहार चे अध्यक्ष शरद जाधव इत्यादी मान्यवर व क्रिकेट चाहते व खेळाडू मोठया संख्येत उपस्थित होते सर्व उपस्थितांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.