शुभम वाकचौरे जांबुत
जांबूत ता ; शिरूर सन २००३ मध्ये उषा रमेश रणदिवे यांना घरकुल मिळाले होते. पण प्रत्यक्षात त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत देण्यात आला नाही. वीस वर्षानंतर ही घटना आता उघडकीस आली आहे. लाभार्थी आज देखील बेघर आहे . वेळोवेळी वर्ग करण्यात आलेले पैसे जांबूत ग्रामपंचायत यांच्या फक्त दप्तरी (कागदपत्री)आढळत आहे. जांबूत ग्रामपंचायत च्या कॅशबुक मध्ये रक्कम ५०००,१५०००,८३१५ एकूण रक्कम = २८३१५ ही रक्कम त्यावेळी तीन हप्त्यामध्ये काढण्यात आली होती.सन २००३ मध्ये जसे घरकुलाचे काम होईन तसे पैसे दिले जात होते.ज्यावेळी घरकुलाचे पूर्ण काम होईल त्यावेळी शेवटचा हफ्ता दिला जात होता.जांबुत ग्रामपंचायत च्या अंदाधुंद कारभारामुळे कशी काय ही घटना घडली आहे.यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे जांबुत येथे सन २००३ मध्ये कागोदपत्री मिळालेल्या लाभाचा प्रश्न सद्या ऐरणीवर आहे.
लाभार्थीने सन २०२२ मध्ये ग्रामपंचायत जांबुत यांच्याकडे घरकुल मिळावे यासाठी अर्ज केला . तेव्हा लाभार्थीला सांगण्यात आले तुम्हाला यापूर्वी घरकुलाचा लाभ दिला गेला आहे. त्यामुळे परत घरकुलाचा लाभ मिळणार नाही. लाभार्थीने वारंवार ग्रामपंचायत जांबुतला तोंडी व लेखी अर्ज देऊन कळवले की मला प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही व मला घरकुलाचे हफ्ते किंवा पैसे देखील मला मिळाले नाही. त्यामुळे आपण या घरकुलप्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती केली होती.
या प्रकरणाची चौकशी न झाल्यामुळे लाभार्थीने मा. गटविकास अधिकारी शिरूर, मा. तहसीलदार शिरूर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे , मा. जिल्हाधिकारी पुणे, मा. पोलीस निरीक्षक शिरूर यांच्याकडे तक्रार दिली.
सदर तक्रारीची दखल घेत प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास पुणे, यांनी कागदपत्राची खातरजमा करून चौकशी करून सदर बाबत शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारास व तसे केल्याचे या कार्यालयास अवगत करावे असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरूर, यांना दिले आहे. गटविकास अधिकारी शिरूर यांनी जांबूत ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवक यांना घरकुलाची रक्कम त्यावेळी कोणाच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. सर्व माहिती तक्रार दाराला देऊन.तसा अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.