शिरूर प्रतिनिधी:- फिरोज सिकलकर

घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करायचा असेल तर त्यासाठी केंद्र सरकारच्या एनसीडीसी यांने पैसे देणे महत्वाचे आहे ही संस्था देशाचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या खात्या अंतर्गत आहे. माझे अमित शहा यांचे चांगले सबंध आहे तुम्ही शिरूर हवेलीतून माऊली उर्फ माऊली कटके यांना विजयी करा मग अमित शहा यांच्याकडून व एनसीडीसी संस्थेकडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला पैसे आणुन कारखाना सुरू करण्याची जबाबदारी माझी असणार असे अश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले आहे.

न्हावरे ता. शिरूर महायुती व राष्ट्रवादी क्राँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते. या सभेला शिरूर तालुका व हवेली तालुक्यातील मतदार नागरीक व महिला उपस्थित होते.यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, दौलतनाना शितोळे, राजेद्र जासुद, रविंद्र काळे, राहुल पाचर्णे, शशिकांत दसगुडे, शरद कालेवार, सुनिल जाधव, स्वप्निल रेडडी, अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, आरपीआय, शिवसेना मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्त प्रचंड प्रमाणात उपस्थीत होते.घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद होण्यात माझा कुठलाही हात नाही समोरचे उमेदवार यांच्या चुकामुळे कारखाना बंद पडला आहे माझ्यावर खापर फोडण्याचे कारण नाही. तिसऱ्या टप्यातील औदयोगिक वसाहत करडे भागात येत आहे. येथील कंपन्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री आम्ही सर्वजण मिळून नवीन कायदा करून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असे अजित पवार यांनी सांगितलेराज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी एकेक आमदार महत्वाचा आहे. शिरूर हवेलीचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांना विजयी करा असे अवाहन अजित पवार यांनी मतदारांना केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button