प्रतिनिधी : शकील मनियार
स्वर्गीय गणेश सिताराम बोंबे यांच्या १८ व्या पुण्यस्मरणार्थ महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीमद् भागवताचार्य ह. भ. प .बाळासाहेब गायकवाड वळतीकर यांच्या श्रीमद् भागवत कथा यज्ञ सोहळ्याचे आयोजन सीताराम दत्तात्रय बोंबे परिवाराने केले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीमद् भागवताचार्य बाळासाहेब गायकवाड हे गुरुवर्य वैकुंठवासी कोंडाजीबाबा डेरे यांच्या कृपेचा प्रसाद तसेच मौनी बाबांच्या आशीर्वादाने श्रीमद् भागवत कथेचा यज्ञ सोहळा साजरा करतात.
'श्रीमद् भागवत कथा श्रवण केल्याने मागील अनेक पिढ्यांचे दोष नष्ट होतात' . "श्रीमद् भागवत कथा म्हणजे वेद वृक्षाचे परिपक्व फळ आहे.' ती शुक्राचार्यांच्या मुखातून अमृतवाणी निर्मिती झाली आहे."
तेव्हा भागवत कथा ही ऐकली पाहिजे .असे प्रबोधन ते आपल्या ज्ञान कथेच्या माध्यमातून बाळासाहेब गायकवाड महाराज महाराष्ट्रभर करतात.संपूर्ण महाराष्ट्रभर आत्तापर्यंत बाळासाहेब गायकवाड महाराजांनी शुल्क न घेता शेकडो ज्ञानयज्ञ सोहळे संपन्न केले आहेत."भगवान श्रीकृष्णचे वर्णन सांगून फक्त चालत नाही" .तर तो महिमा गायन करून सांगितला पाहिजे. त्यासाठी ह.भ.प.राजेंद्र महाराज खवळे सरपंच तिकी (मिरजगाव) तबलावादक ह .भ. प. नवनाथ महाराज राठोड ,नासिक ऑक्टोपॅड वादक ह. भ .प .अश्विन महाराज जाधव .येवला तसेच कृष्णलीला ह. भ .प. कपिल महाराज नागपूर यांची उत्तम उत्तम साथ या ज्ञान कथा सागरास लाभली आहे .सिताराम दत्तात्रेय बोंबे दाभाडे -मळा पिंपरखेड येथे आयोजित केलेल्या ,या श्रीमद्भागवत कथेची सांगता रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या दिवशी सुदामा चरित्र, कृष्ण उपदेश, श्री दत्तात्रय 24 गुरू, श्री बळीराम -श्रीकृष्ण अवतार समाप्ती ,श्रीशुक्रदेव प्रस्थान आदी विषयावर कथन करून महाप्रसादाने समाप्ती होणार आहे.