शिरूर प्रतिनिधी:-फीरोज सिकलकर
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कारखाना सुरु करण्यासाठी एनसीडिसी या केंद्राच्या संस्थेकडून पैसे मंजुर झाले होते व ते देण्यासाठी राज्य शासनाने नकार दिला होता याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना मी व आमदार अशोक पवार भेटलो परंतु त्यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी पैसे देण्यासाठी माझी अडचण होती असे स्पष्ट सांगितल्याने मी ओळखून घेतले की ही अडचण करणारा नेता कोण ? याच नेत्याने घोडगंगा सहकारी साखर कारखाना कसा चालु होतो बघतोच असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांची नक्कल केली.शिरूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले राज्यात शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राहुल गांधी यांचे सरकार आले तर प्रत्येक नागरीकाला २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण व महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देण्यात येतील असे सांगुन ते म्हणाले राज्यशासन घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडून सर्व सामान्य शेतकरी वर्गाचे संसार मोडण्याचे काम करत आहे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले की लगेचच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी देवुन साखर कारखाना सुरु करू असा शब्द पवार यांनी दिला.यावेळी उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी प्रवकते विकास लवांडे, स्टार प्रचारक हेमा कुलकर्णी, के. डी. कांचन देविदास भन्साळी, जगन्नाथ शेवाळे, वैभव यादव, पोपट शेलार, संजय सातव, मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्त व नेते उपस्थित होते.मोठ्या जल्लोषात शिरूर हवेली मतदार संघात वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली.महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार म्हणाले कर्ज माफी शरद पवार साहेबामुळे झाली माझी निष्ठा पवार साहेब बरोबर आहे मी गद्दारी केली नाही कारण गददारी शिक्का मरेपर्यंत जात नाही शिरूर तालुका साहेब मुळे सुजलाम सुफलाम झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार आहे विश्वासही पवार यांनी दिला. संकट काळी धावुन येणारा नेता म्हणजे शरद पवार असुन मरे पर्यंत माझी निष्ठा राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.