जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
जुन्नर विधानसभा मतदारसंघ 195 विभागातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारे निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून नारायणगाव पोलिसांच्या वतीने नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च करण्यात आला.निवडणूक काळात प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. त्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक 31/10/2024 रोजी सकाळी 10/30 ते दुपारी 02/30 वा.चे सुमा.मौजे नारायणगाव येथे नारायणगाव एसटी स्टँड ते सराफ कट्टा मुस्लिम मोहल्ला,इंदिरानगर ,पेठ आळी ,हनुमान चौक इत्यादी भागांमध्ये रूटमार्च चे आयोजन केले होते.
तसेच मौजे कांदळी येथील मज्जिद व निमगाव सावा येथील मज्जिद व गावठाण या भागांमध्ये रूट मार्च घेण्यात आले सदर रूट मार्च साठी नारायणगाव पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी 20 अंमलदार ,जुन्नर उपविभागामधील आरसीपी चे 2 पथक, सीआयएसएफ 1 अधिकारी 44 जवान यांनी 4 सरकारी वाहनां सह वर नमूद फौज फाट्या सह सदर रूट मार्च काढण्यात आला.