निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
विक्रमगड आश्रम शाळाचे अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक सोमनाथ पवार यांना अचानक चक्कर आल्याने जाग्यावर तात्काळ निधन झाले. सोमनाथ पवार हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतीला सामना करीत शिक्षण पूर्ण केले.मजुरी कामाची लाज न बाळगता सतत कामाला प्रधान्य दिले. यातूनच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आश्रमशाळा मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारली.
विद्यार्थी आणि विद्यार्थीनी 500 अशा वस्तीगृहाची जबाबदारी स्विकारून 30 शिक्षक सेवकांच्या स्टाफसह विक्रमगड येथील शाळा प्रगतीपथावर आणली. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीत पारंगत केले .तर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने सोमनाथ पवार सर यांच्या रूपाने साने गुरुजीं लाभले होते.
शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र काम करत असतानाच त्यांनी आपली मुलगी पूर्वा यांना डॉक्टर केले .तर मुलगा प्रसाद यास इंजिनिअर केले. दुर्गम भागातील नोकरीचा बाऊ कधी केला नाही.करतात. सोमनाथ पवार सर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या निधनाची बातमी विक्रमगड परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सरांच्या निधनाने टाहो फोडला. संस्थेचे सचिव पदाधिकारी दिवसभर होते. त्यांच्या निधना निमित्ताने शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वय प्राध्यापक काशिनाथ आल्हाट, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले, क्रांतीगुरू लहुजी साळवे महाराष्ट्र शासन समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजीराजे राजगुरू ,पिंपरी चिंचवडचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दादाभाऊ आल्हाट,पोलीस अधिकारी बाळासाहेब सकाटे, सेवानिवृत्त डि. वाय एस.पी.रमेश भोसले आश्रम शाळेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक प्रतिनिधी पाटील सर, पिंपरी चिंचवड पी .एम. टीचे वाहक संतोष पंचरास ,युनियन बँकेचे कॅशियर अशोक खुडे,विजय शेंडगेसाहेब, डॉ.पूर्वा आल्हाट यांचा सर्व मेडिकल स्टाप, प्रसाद पवार यांचे सर्व मित्र परिवार यांनी या निमित्ताने शोक व्यक्त केला. अल्कोन कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर आकाश आल्हाट यांचे सासरे होते.