निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत भारतभर गेल्या विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप करताना तीन दिवसापासून आपण ध्वजारोहण करत आहोत. याच अनुषंगाने निर्वी येथील ग्रामपंचायतच्या वतीने सैनिकांच्या शौर्याप्रती देशवासीयांच्या मनात त्यांच्या प्रति कायम आदराची ज्योत तेवत राहावी यासाठी त्यांना अभिवादन करणारी ‘कोनशिला’ अनावरण करण्यात येऊन सर्व आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर गावच्या सर्व आजी-माजी सैनिकांचा नामफलक निर्वी येथील ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आला त्याचाही अनावरण सर्व आजी-माजी सैनिकांनी केले. याप्रसंगी सर्व सैनिकांनी आपले कर्तव्य बजावताना आलेली संकटे निधड्या छातीने कशी परतवून लावली, याबाबतीत रोमांचित करणारे अनुभव सांगून आपली मनोगते व्यक्त केली. तरुणांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ दिला पाहिजे अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. नोकरीच्या काळातील जीवन खडतर होते, परंतु गावी आल्यानंतर जो सन्मान ग्रामस्थ देतात, त्यावेळेस जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद होतो. मनामध्ये एक वेगळा अभिमान निर्माण होतो हा अभिमान मनात ठेवून आम्ही नेहमी समाज उपयोगी विधायक काम करत राहू अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिलं. याप्रसंगी मेजर बंडू सोनवणे, मेजर भाऊसाहेब सोनवणे, मेजर अशोक सोनवणे, मेजर निलेश सोनवणे, मेजर सुनील सोनवणे, मेजर संदीप सोनवणे, मेजर सोमनाथ सोनवणे, मेजर रवी सोनवणे, मेजर राहुल सोनवणे, मेजर भीमराव सोनवणे, मेजर दत्तात्रय माळवदकर, सरपंच शोभाताई तरटे,उपसरपंच मनीषाताई पवार, माजी उपसरपंच निलेश सोनवणे, कैलास सोनवणे चेअरमन , पोपटराव पवार, बाळासाहेब साळुंके, चंद्रकांत कांबळे, प्रल्हाद सोनवणे, शंकर सोनवणे, बापूसाहेब सोनवणे, विनोद सोनवणे, डॉ. प्रतिमा सातव, सुदा बहणजी, ग्रामसेवक सुरेश साळवे, शितल जगताप, प्रमोद राजगुरू, पत्रकार वसंत सकट,मारुती सोनवणे,तलाठी गणेश बिघोल. इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे यांनी केले आभार सरपंच शोभा तरटे यांनी मानले.