प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
विकसित भारताच्या जडणघडणीत खेळाडूंचे विशेष योगदान असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
कार्यक्रमाला विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक,जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,तालुका क्रीडाअधिकारी दादा देवकाते,निवड समिती सदस्य अजय पवार,मेघाली म्हसकर,ज्ञानेश्वर खुरंगे निखिल बुंदिले,पुणे जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत,मा.जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे,खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रा जितेंद्रकुमार थिटे,मा.अध्यक्ष रामदास रेटवडे,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,राजगुरुनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मनीषा टाकळकर,सातकर स्थळचे मा.सरपंच अजय चव्हाण,संभाजी काळे,स्पर्धा संयोजक राजकुमार राऊत,उमेश गाडगे,महेंद्र काळे राहुल देशमुख,सतीश गाडगे,अनिकेत साबळे उपस्थित होते.आमदार मोहिते पुढे म्हणाले की सुदृढ,सक्षम युवा पिढीसाठी खेळ आवश्यक आहे.
आभासी जगापासून युवा पिढी दूर जाण्यासाठी पालकांनी,शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.कौशल्याधिष्ठित खेळाडूच भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व करतील असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की खेळात खेळाडूंनी सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे असून त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठीअमरावती,नागपूर,लातूर,नाशिक,मुंबई,पुणे,कोल्हापूर विभागाचे स्पर्धक,प्रशिक्षक सहभागी झाले होते.