जुन्नर / शिरोली बु प्रतिनिधी सचिन थोरवे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या , न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक या विद्यालयामध्ये वनराई अंतर्गत इको क्लब व राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख श्री देवकुळे संतोष , श्री विरणक सुनिल श्री निधन तुकाराम , सौ मुंढे रंजना, सौ नलावडे रुपाली , सौ पादीर प्रियांका व श्रीम कविता ढेरंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दिवाळीसाठी विद्यार्थ्यांकडून मातीची पणती सजवणे ,आकाश कंदील बनविणे व कागदी पुठ्यांपासून रांगोळीचे आकार हे उपक्रम विद्यालयात राबवले गेले .आजकाल मोबाईलच्या युगात वावरत असताना परंपरागत बांबूच्या काट्यापासून तसेच घोटीव कागद व कागदी पुठ्यांचा वापर करून सुंदर आकाश कंदील निर्मिती करून स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थी घेतला . कानटळ्या बसणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने पशू पक्षी तसेच आजारी अबाल वृद्ध त्यांना त्याचा त्रास होतो या सर्वांचा विचार करून .
येणारी दिवाळी आनंदाची व प्रदूषण मुक्त सर्वांना जावी यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीला फटाके न वाजविता प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली व त्या पैशातून गरीब मुलांना शिक्षण उपयोगी साहित्य उपलब्ध करून द्यायचे असे ठरविले. या सर्व उपक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनघा घोडके यांनी केले . अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रसाद हांडे यांनी दिली .