[ : जातेगांव बु ( ता . शिरूर ) वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने श्री . संभाजीराजे विद्यालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शन व अन्य उपक्रम ]
प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
वाचन प्रेरणा दिना निमित्तानेसंभाजीराजे विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन .”ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य वाचनात आहे.मानवी जीवनात चरित्रातून चारित्र्य संवर्धन करणेचा महामार्ग म्हणजे दैनंदिन वाचन होय.विद्यार्थी दशेपासून जीवनाच्या रोजच्या वाटचालीत प्रसन्नता,प्रगल्भता,आदर्शवाद व सुस्थिरता या मूल्यांसाठी प्रत्येकाने दैनंदिन १५ मि.वेळ वाचनासाठी द्यावा असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करणे आवश्यक आहे “असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले .जातेगांव बु ( ता शिरूर ) येथीलश्री.संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने पुस्तक,पोस्टर्स ग्रंथ प्रदर्शन,वाचन उपक्रम,वाचन प्रेरणा दिन शपथ,मराठी राजभाषा संवर्धन,वाचन कट्टा उपक्रमांचे आयोजन करणेत आले होते.या प्रसंगी दररोज १५ मि वाचन करणेची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्ताने साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाबाबत विद्यालयीन विद्यार्थ्याना त्यांच्या जीवनकार्याचा जीवनपट सांगण्यात आला.डॉ कलाम यांच्या जीवनातील तंत्र-विज्ञानातील प्रगती,वैज्ञानिककामगिरी,अध्यात्मिक विचारधारा इ बाबतचे पैलू उलगडण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य रामदास थिटे,प्राचार्य डॉ.विजय गायकवाड, सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक गणेश बांगर,सुनिता उमाप,संगिता ढवळे,विजय वरपे,प्रिती पवार,रमेश जाधव,शंकर भुजबळ,कांतीलाल धुमाळ,प्रिया उमाप आदि मान्यवर सहभागी झाले होते .