प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती* महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची अग्रगण्य असलेली सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेनेदिल्ली,गुजरात,कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा या राज्यांतील सहकारी सस्थांना मागे टाकत राष्ट्रीय आदर्श सहकारीसंस्थेचा पुरस्कार प्राप्त केला.राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती बेळगावी या संस्थेने वरील राज्यातील सहकारी संस्थांचे मुल्यांकन करून पुरस्कार जाहीर केला.
सेकंडरी पतसंस्थेची स्थापना १९७५साली करण्यात आली.संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून या संस्थेच्या २८शाखा आहेत पैकी १४ शाखा स्वमालकीच्या आहेत.संस्थेची सभासद संख्या ३२०००असून चालू आर्थिक वर्षात संस्थेचा संयुक्त व्यवसाय २१६५ कोटी रुपयेआहे.संस्थेने सभासदांना १२० कोटी कर्जवाटप केले असून संस्थेकडे सभासदांच्या ९६४ कोटींच्या ठेवी आहेत.सभासदांच्या हिताच्या अनेकयोजना संस्था राबवत असते. जीवनसुरक्षा ठेव योजना यामध्ये मृत सभासदांचे कर्ज माप केले जातेसभासद मेडीक्लेम योजनेत पाचलाखापर्यंत क्लेम तसेच आई वडील सह सासू-सासरे यांच्या साठी स्वतंत्र मेडीक्लेम योजना, ठेवीसाठी आकर्षक व्याज दर, लोणावळा, नारायणगाव कराड व सोलापूर येथे विश्रामगृह आहे .तर महाबळेश्वर येथे नियोजीत प्रशिक्षण केंद्र व विश्रामगृह बांधत आहेत.संस्थेमार्फत सभासदांना पर्यटन विभाग देशांंर्गत व देशाबाहेर सहकार तत्वावर सभासद कौटुंबिक सहलीचे आयोजन केले जाते सभासदांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार,सभासदांच्या १० वीमध्ये उत्तीर्ण पाल्यांना दरवर्षी आकर्षक भेट दिली जाते.या सर्व योजनांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील यांनी केले.
या पुरस्काराबद्दल सर्व सभासदांनी पदाधिकारी व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सचिव किशोर पाटील,उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,सहसचिव सतिश माने,खजिनदार सतेश शिंदे,संचालक पांडुरंग कणसे,अजित चव्हाण जगन्नाथ जाधव ,प्रमोद देशमुख गोविंदराव सूळ, राज्य मुख्याध्यापक महामंडळचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलवडे इ.संचालक मंडळ उपस्थित होते पुणे जिल्ह्याचे पालक संचालक तथा प्राचार्य तुकाराम बेनके यांनी सर्व पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले.