* भाग 8 वा शब्दांकन काशिनाथ आल्हाट *
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
निवृत्ती महाराज गायकवाड यांचा प्रपंचातून परमार्थ म्हणजे माउंट एवरेस्ट चढणे होते. परमार्थाचे शिखर चढण्याच्या प्रवासात कधी भाव भावना आड येतील. कधी कधी बर्फाचे वादळ येईल .तर कधी आसमान खचून जाईल. कधी चुकीचे पाऊल पडेल. तर कधी जवळचे मित्र साथ सोडून जातील. परंतु थांबून चालणार नाही. मन घट्ट करून शिखर सर करायचे. ध्येय सोडून चालणार नाही. हे व्रत त्यांनी अंगिकारले होते. ह .भ प निवृत्ती महाराज यांचे जीवन जीवनप्रवास पाहिल्यानंतर हे लक्षात येते. की, आई-वडिलांचे छत्र हरपलेला मुलगा. जगणं वा-यावरची वरात.परंतु जीवनामध्ये नैराश्याचे ढग दूर करून आकाशाकडे झेप घेणारा .हा तरुण होता. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार अंगिकारुन परमार्थाची गुढी उभारली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची भगवी पताका खांद्यावर आयुष्यभराची घेवून परमार्थाच्या वाटेचा वाटसरू झाला.
ह्य वाटेचा प्रवास किती आनंदी आहे?. हे जीवनभर इतरांना सांगत राहिले. गायकवाड महाराजांचे जगणे हे “*मरावे परी कीर्ती रूपी उरावे* या उक्तीप्रमाणे प्रमाणे सार्थकी ठरले. त्यांच्या कर्तुत्वाचा पाऊल खुणा आज भक्ती मार्गाच्या अनेक ठिकाणी साक्ष देत आहेत. जाणीव पूर्वक लक्ष देणारा .समाजातील घटक आणि समाज बांधव दुर्लक्ष करणार नाहीत. संत कार्याप्रमाणे निस्वार्थी जगणे, दुसऱ्यासाठी झटणे ,समाज प्रबोधन करणे आणि या मार्गातून मिळाला मोकळा वेळ तर स्वतःच्या प्रपंचाचा विकास करणे . ही त्यांची जीवनशैली होती. ” खरं तर ‘!मला असे वाटते .त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विकास करताना जो विचार केला. तो योग्य होता.आज त्यांची प्रचिती येते .*आधी केले ,मग सांगितले*” . या उक्तीप्रमाणे ते जगले असे मनापासून वाटते. जर ते फक्त दिंडी, वारी, हरिनाम सप्ताह करत राहिले असते .आणि कुटुंबाकडे लक्ष दिले नसते.तर कुटुंबाची वाताहात झाली असती. योग्य वेळी योग्य काळात मुलांचे ते मार्गदर्शक ठरले. त्यांचा मुलगा प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी “माझ्या वडिलांची मीरास गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा” ही पांडुरंगाची सेवा अव्यातपणे घडावी. या निमित्ताने पांडुरंगाच्या नामस्मरणाबरोबर वडिलांना दिलेला परमार्थाचा मार्ग निरंतर चालू ठेवला आहे. नाही तर मुले वेगवेगळ्या वाईट मार्गाला कदाचित लागली असती. अशा वेळी समाजांने टिकाटिपणीचा भडिमार केला असता . ज्यांना स्वतःचा प्रपंच धड करता आला नाही त्याने काय प्रबोधन करावे?.असे सवाल समाजाने विचारले असते.त्यांना माफ केले नसते .
आज परमार्थातून प्रपंच कसा करता येतो? याचे उत्तम उदाहरण म्हणजे बहुजन समाजाला आदर्श असा गायकवाड महाराजांचा परिवार आहे. ज्यांचा ज्यांचा गायकवाड महाराज आणि त्यांच्या परीवाराचा वैचारिक संबंध आला असेल . त्यांची नक्की खात्री झाली . की,निवृत्ती महाराजांचे परमार्थातून प्रपंच आणि प्रपंचातून परमार्थाचा प्रवास म्हणजे माउंट एवरेस्टचे चढणे असे म्हणावे लागेल. ‘खरं तर! या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कालखंडात दिंडी ,वारी, हरिनाम सप्ताह , आळंदी येथील धर्मशाळा, पंढरपूर येथील किर्तन, भामचंद्र डोंगरावरील सप्ताह, गावडेवाडीचा सप्ताह अशा अनेक ठिकाणी त्यांच्या विचारांशी सहमत असणारे, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे, अशा अनेक थोर मोठ्यांनी उत्तम साथ दिली. काहिंनी कृष्णा आणि सुदामाची मैत्री काय असते? .ती दाखवली. तर काहींनी त्यांचे विश्वासू मित्र ,सोबती, सहकारी, म्हणून जबाबदारी पार पाडली. मधुकर साळवे ,दिंडीचे चोपदार बबनराव राजगुरू अवसरी ,कै. तानाजी साळवे जुन्नर, कै.गणपत राजगुरू ,कै. नामदेव उनवणे सर निमगावसावा, भोसरीचे कॉन्ट्रॅक्टर रामचंद्र पंचरास, सोनबा पंचरास, मुरलीधर पाटोळे, मुख्याध्यापक श्री खवळे सर ,शिक्षण संस्था चालक लोणंदचे कै. सूर्यवंशी सर, सध्या त्यांचे चिरंजीव पंढरपूरचे श्री वाघमारे, आळंदीचे श्री अशोक कांबळे उमरगेकर, देहुचे सोपान चव्हाण, ठाकूर पिंपरीचे भाऊसाहेब लोखंडे, लोणीचे अर्जुन पंचरास ,गावडेवाडीचे माऊली गावडे, ह. भ. प. दीनानाथ शिंदे, संतोष गावडे, ह. भ .प .अशोक महाराज हाकाळे, आदिनाथ महाराज जुन्नरकर, प्रभाकर महाराज फुलसुंदर ,वैरागर प्रभाकर , नानासाहेब लोंढे, लक्ष्मण लोंढे कोरेगाव, संभाजी लोंढे, मंगलाताई वेळेकर आळंदीचे माजी नगरसेविका ,बबनराव पाटोळे राजगुरुनगर, कै. ज्ञानबा पवार खेड, कै. दौलतराव नेटके पेठ, कै. काळूराम नेटके, कै. महादू नेटके पुणे ,माधव शेंडगे पुणे ,प्रवीण सावंत, वंदनाताई सावंत देहू , विष्णू आल्हाट येडगाव, रखमाजी साळवे जुन्नर, कै. सिताराम आल्हाट निरगुडे,सागर जाधव पुणे, गोविंद चव्हाण ,समुद्राबाई घनवट कोरेगाव, भाऊसाहेब लोंढे, जनाबाई लोंढे ,रामा लोंढे ,शोभा खुडे पुणे ,ज्ञानेश्वर गावडे, अनाजी शेळके, बाबाजी साळवे, राजाराम अस्वार भाऊसाहेब, गावडे दिलीप आयएएस अधिकारी गावडेवाडी, प्रकाश मोहिते, कै.रुक्मिणी मोहिते, मुरलीधर शिंदे खरपुडी,कै. छबानराव शिंदे खरपुडी, नारायण शिंदे भोसरी.,सातारा, कराड, बीड ,उस्मानाबाद , जुन्नर, आंबेगाव ,खेड ,शिरूर, मुंबई येथील ज्ञात अज्ञात असंख्य लोक या सर्वांनी कोणी धर्म शाळेसाठी, कोणी दिंडीसाठी ,कोणी हरिनाम सप्ताहासाठी मदत केली. ह.भ.प. निवृत्ती महाराज गायकवाड यांची 66 वर्षाची आळंदी, पंढरपूरची पायी वारी , 27 वर्षाची आजा मेळा दिंडी आणि हरिनामाची चार पिढ्यांची परंपरा ही सरस्वतीच्या गाभाऱ्यातील ज्ञानप्रकाशाच्या समईतील वातीप्रमाणे तेवत ठेवली.
प्रबोधन करताना चंद्राची शितल छाया दिली. जीवन रुपी अगरबत्तीचा सुगंध दिला.आधाराचा धीर दिला.तर काहिंच्या हाताला हात मदतीचा दिला. ह. भ. प .गायकवाड महाराज यांच्या कर्तुत्वाची, नेतृत्वाची, प्रबोधनाची, दातृत्वाची दखल अनेक संस्था, संघटनांनी घेतली होती .संत तुकाराम महाराज पुरस्कार , मातापिता पुरस्कार,आदर्श प्रबोधनकार (आळंदी) पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या कर्तृत्वाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर समाजभूषण या पुरस्काराने महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते हस्ते आयुष्याच्या उत्तरार्धात सन्मानित करण्यात आले होते. ‘हा सन्मान म्हणजे निवृत्ती गायकवाड महाराजांनी आयुष्यभर मानवतेची अखंड सेवा केल्याने, परमेश्वराने दिलेला प्रसाद होता'”!