शब्दांकन* =*काशिनाथ आल्हाट*
*भाग 11 वा*.========….====* *कुळी कन्या पुत्र होते*, *जी सात्विक*
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
या संत वचनानुसार निवृत्ती महाराज गायकवाड यांची मुले आणि मुलींचे वर्तन हे सात्विकतेचे उदाहरण आहे. ‘ खरं तर !निवृत्ती महाराजांना तीन मुले आणि तीन मुली. त्यापैकी भीमाताई ही मोठी मुलगी.आज भीमाताई ह्या 68 वर्षाच्या आहेत. सध्याचे त्यांचे नाव सौ. भीमाताई ज्ञानदेव लोंढे तर पूर्वाश्रमीचे नाव भीमाताई निवृत्ती गायकवाड. भीमाताईने बापाची गरिबी काय असते? आणि कुटुंबामध्ये आईचे संसाराला कष्ट काय असतात? याची खरी जाणीव भीमाताईला आहे. भीमाताईंचे बालपण जर पाहिले .तर गरिबीच्या वेदना सहन करत करत, छोट्या-मोठ्या कामात आईला कष्टाला हातभार लावत आणि कणखर बापाच्या विचारांचा वसा अंगीकरत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. वडील निवृत्ती महाराज दिंडी ,वारी, हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. की, आईला कामांमध्ये आधार देण्याचे काम भीमाताई मोठ्या प्रमाणात केले. वेळप्रसंगी कधीकधी रुपया सव्वा रुपयांने शेत मजुरीचे काम करावे लागले . तर उपास सहन करावा लागला.या पण त्या परिस्थितीने भिमाताईंना जीवन जगण्याचें शिकविले. शिकण्याची संधी मिळाली. चटणी भाकरीने पोटाची आग कित्येक वेळा विझविली.अनेक वेळा घरच्या शेतीबरोबर बाहेरच्या शेती वरती मजूरी केली. आईच्या जिवाभावाची मैत्रिण झाली. संप्रदायचा वारसा पुढे सतत चालावा म्हणून मोठ्या मुलीचे नाव भिमा तर मोठ्या मुलाचे नाव पांडुरंग ठेवले. भिमाताईंचे शिक्षण. जुनी एस एस सी झाले. शिक्षण चालू असतानाच शालेय शिक्षणाबरोबरच संप्रदायाचे शिक्षण सुद्धा घरात वडिलांना कडून मिळत होते. जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळत होती. संप्रदायातून संस्काराची प्राप्ती झाली. संस्कारातून जीवन जगण्याची रीत समजत गेली. ‘”प्रत्येक मुलगी ही बापाची लाडकी असते.’! एस भीमाताई सुद्धा अपवाद नव्हत्या.”मुलगी बापाचं हृदय असते”. ज्या ज्या वेळी माता सुभद्राबाई आणि बाप निवृत्ती महाराज यांच्यात संसारातील छोट्या मोठ्या कारणांवरून वाद होत. तेव्हा भीमाताई या आई-वडिलांमध्ये समन्वयकाची भूमिका पार पाडत. वडिलांच्या बाजूने जास्त त्या झुकल्या जात. बाप किती मोठा आहे? सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांचं किती नावलौकिक आहे? सातत्याने आईला पटवून देत .तर आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांची आवड त्यांची भक्ती ही आपण जोपासली पाहिजे. हे एकदा नाही तर अनेक वेळा सांगत.माता सुभद्राबाईचे परिवर्तन करण्याचे काम त्या बालवयातही भीमाताईंनी अनेक वेळा केले. भीमाताईंना बालवयातच संप्रदायाचे बाळकडू वडील निवृत्ती महाराज यांच्याकडून पाजले गेले. सतत घरात येणाऱ्या जाणा-याची रेलचाल होती. सतत गडबड. सतत गोंधळ .बाबा घरी कधी एकटे यायचे नाहीत. त्यांच्याबरोबर दोन चार माणसे असत.संतांचा गोतावळा असायचा. घरी आलेल्या सगळ्यांची उठा ठेव हे सगळं आईला करावा लागे. आणि आईला थोडी फार मदत लहानपणापासून भिमाताई करत. जेवढे पाहुणेरावळे घरी येत. तेवढा बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद भिमाताईंनी पाहिला.
घरी येणाऱ्यांमध्ये काही कीर्तनकार ,प्रवचनकार, काही अभ्यासक ,माळकरी मंडळी सातत्याने घरी येत. आणि घरामध्ये नेहमी चर्चा होत. अभंगाच्या, परमेश्वराच्या ,हरीरानामाच्या चर्चा सातत्याने घडत . ते विचार भीमाताईंच्या कानावरती पडून त्या संस्कारातच त्या मोठ्या झाल्या . निवृत्ती महाराज प्रवचन, .हरिपाठ प्रवचन कीर्तन करत असताना त्या वडिलांच्या समोर बसायच्या. वडिलांचा शब्द आणि शब्द हा त्या काळात साठवून हृदयात घर करून ठेवत. आणि मनात सहज त्यांच्या विचार येऊन जायचा. की, ‘*माझा बाप* *किती सुंदर प्रवचन* *करतो* ?”किती प्रबोधन छान करतो?’ त्यांची गाण्याची पद्धती, सुंदर व देण्याची पद्धती, त्यामुळे लोक मंत्रमुग्ध होत. ” मग मी सुद्धा एक दिवस माझ्या बापासारखं होण्याचा प्रयत्न करेल !अशी भावना या भीमाताईंच्या मनात सातत्याने रेंगाळत राहायची .आणि ते स्वप्न ती इच्छा ती अपेक्षा ही वडिलांच्या समोर तिने हट्ट धरला .की, “मला सुद्धा प्रवचन करण्याची इच्छा आहे .! “खरं तर ?घरात या क्षेत्रात परमार्थ क्षेत्रामध्ये निपुण असलेले निवृत्ती महाराज यांनी मुलीच्या हुशारीची दखल घेतली. तिच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना संधी दिली. तिचा परमार्थ तिला उघड्या डोळ्यांनी पाहिले. आणि ही मुलगी माझ्यासारखी सांप्रदायाचा वारसा चालवल्याशिवाय राहणार नाही!. याची खूणगाठ मनाशी केली. भिमाताईंना प्रवचन करण्यासाठी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पोथ्या वाचून घेतले .जे काही पारंपरिक काही मुद्दे किंवा काही संदर्भ असतात. त्याची शिकवण दिली. दाखले दिले .आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, यांच्या सेवेची संधी त्यांनी त्या काळात त्यांना दिली. भीमाताईंनी वयाच्या “18 व्या वर्षी प्रवचन करायला सुरुवात केली. भीमाताईचे धाडस ,शब्द फेक आणि त्या प्रमाणातील संदर्भ देत असतानाची हुशारी ही वडील निवृत्ती महाराज उघड्या डोळ्याने साठवून ठेवत होते.मुलगी कुठे चुकते ?किंवा काही सुधारणा केली गेली पाहिजे ?हे प्रवचन झाल्यानंतर ते तिला समजून सांगत .पुढे पुढे बाबांच्या प्रवचनाचा कीर्तनाचा वसा वारसा हा निर्विवाद पणे पुढे चालू ठेविल.
आता तिला अनेक ठिकाणच्या प्रवचन कीर्तनाच्या तारखा येवू लागल्या .लोकांची मागणी वाढली. अनेक गावांमध्ये त्यांचे कीर्तन रंगू लागले . हे पाहिल्यानंतर भीमाताई माझी मुलगी कीर्तनाच्या फडात उभी आहे .आणि सर्व भाविकांना ती मंत्रमुग्ध करते. ज्यावेळेस उपस्थित राहून. निवृत्ती महाराज त्यावेळी मुलीच्या जन्माचे सार्थक झाले असे वाटले. मुलीने माझ्या नावाचा नावलौकिक करील!. “माझी खऱ्या अर्थाने डोळ्याची पारणे फिटली.”: अशा भावना निवृत्ती महाराज यांच्या मनामध्ये दाटून येत.यावेळी त्यांना प्रमाण आठवे.” *याचसाठी केला होता अट्टाहास* | *मला संपत्ती नाही मिळविता आली .तरी चालेल* , “*पण माझी मी संतती समृद्ध करील*” “संतती समृद्ध असेल .तर ,संपत्ती ही क्षणात मिळेल “., मला संपत्तीचा मोह नाही.! मला समृद्ध संततीचा सतत अभिमान राहिल. अशी संतती घडवील. असे ते सतत म्हणत . माझी संतती परमेश्वराच्या सेवेत एकरूप होऊन. जीवनाचा परम्मोच्च आनंद घेतील.
“मला परमेश्वराच्या अखंड सेवेत राहून परमार्थाच्या वाटेवरती अनेकांना आनंद द्यायचा आहे. मला माझा आणि इतर समाज संपन्न करायचा आहे”या विचाराने निवृत्ती महाराज आयुष्य जगले .तोच संस्कार भीमाताई वरती झाला होता! भीमाताई या गेली 40 वर्ष संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये आहेत .कीर्तनाच्या माध्यमातून अविरतपणे परमेश्वराची सेवा करत आहेत .त्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायिका आहेत. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय संगीतातील संगीत विशारद पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे .सुप्रसिद्ध गायक सुधाकर चव्हाण यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे.
कोरोनाच्या काळात मुलगा नकुल यांचे निधन झाले. नात्यातील सगळेच दुःख मनस्थितीत होते. दशक्रियेच्या दिवशी प्रवचन कोणी करायचे ? असा प्रश्न निर्माण झाला.भीमाताई धाडसी ,धीराची, मला प्रसंगाला सामोरे जाणारी होती् त्यावेळेस स्वतःच्याच मुलाचे दुःख बाजूला ठेवून. भीमाताईंनी मुलाच्या दशक्रियेत प्रवचन केले.
खरे तर परमार्थ हा सहज सोपा नाही. गायकवाड महाराजांनी प्रपंचातून परमार्थ आणि परमार्थातून प्रपंच केला. हे अतिशय कठीण होते.बोल बोलतां वाटे सोपे| करणी करिता टीर कांपे |नव्हे वैराग्य सोपारे|मज बोलतां न वाटे खरे| विष खावे ग्रासोग्रासी|धन्य तोचि एक सोसी|तुका म्हणे करुनि दावि|त्याचे पाय माझे जीवी| ह.भ.प निवृत्ती महाराज गायकवाड हे खऱ्या अर्थाने हे जीवनभर असे जगले.