भाग 6 वा=शब्दांकन =काशिनाथ आल्हाट 8830857875====
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
ह .भ .प .निवृत्ती महाराज गायकवाड हे ध्येयवादी होते. ‘ज्यावेळी एखाद्या माणसाचे ध्येय निश्चित होते. त्यावेळी त्याच्या मागोमाग आचार, विचार, संचार ,आहार, विहार या गोष्टी एक आपोआप एकामागे एक येतात .त्यामुळे आपले ते ध्येय यशापर्यंत घेऊन जाता येते.याच गोष्टी गायकवाड बाबांच्या जीवनातील बदलाचे कारण ठरू शकल्या. ध्येय निश्चित केले. ते त्यांनी हे विचार अंगीकारले होते.
गायकवाड बाबांचे व्यक्तिमत्व म्हणजे ही दीर्घ प्रक्रिया आहे .कोणतीही प्रक्रिया ही स्वतःच्या कर्तृत्वातून प्राप्त होते .त्यासाठी स्वतःचे मन हे संस्काक्षम ठेवावे लागते. सतर्क ठेवावे लागते. ते गायकवाड बाबांनी नेहमी अद्यावत ठेवले. व्यक्तिगत, सामाजिक, आणि राष्ट्रीय मूल्यांचा खऱ्या अर्थाने त्यांनी अंगीकार केला गेला. आणि ती मूल्य आपल्यात रुजवण्यासाठी काय करता येईल? यासाठी ते सर्व प्रयत्नशील राहिले. एक समृद्ध आणि परिपूर्ण असणारे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतात. ते गायकवाड बाबांनी बहुजन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या नात्यातील कुटुंबांपासून सुरुवात केली. असं म्हणावसं वाटेल. हे उदाहरण द्यायचे झाले. तर “एक तुरटीचा खडा, बादली भर गढूळपाणी स्वच्छ करू शकतो”! तर आपण तुरटी स्वरूप विचार आपण आपल्या समाजामध्ये पेरले. ह.भ.प निवृत्ती महाराज गायकवाड बाबांच्या मनात तुरटी प्रमाणे निर्मळ आणि स्वच्छ विचारसरणी होती. आपण सक्षमपणे काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.
गायकवाड महाराजांनी आपले विचार परीवर्तन समाजापर्यंत पोहोचवले. निवृत्ती महाराजांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते .स्वतःला शिक्षण घेता आले नाही . याची खंत मनात होती. परंतु त्यांनी त्यांच्या नात्यातील असणाऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणाची गोडी लावण्याचे काम केले . खेड तालुक्यातील कोरेगाव या ठिकाणी शाळा नव्हती. शिक्षक नव्हता. त्यांनी त्या काळात एका छोट्या खोलीत शाळा सुरू केली. आणि शिक्षक सुद्धा आणले. शिक्षणाचे महत्त्व नात्यातील लोकांना पहिले सांगितले.
नात्यातील संबंधित नानासाहेब लोंढे जे विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झाले. संभाजी लोंढे हे शिक्षण प्रशासन अधिकारी सेवानिवृत्त झाले.जगन्नाथ आल्हाट हे आर्मी खात्यातून सेवानिवृत्त झाले. कै. सिताराम आल्हाट कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. कै. मारुती गायकवाड हे वकील व्यवसायात पारंगत होते. शिवाजी शिंदे सी.ए होऊन त्यांनी उत्तम प्रगत व्यवसाय थाटला आहे. एल .बी गायकवाड हे वैद्यकीय क्षेत्रात आजही कार्यरत आहेत .वसंतराव लोंढे हे वन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत . या सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले होते. बाबांनी मार्गदर्शन केले होते.काहींनायेता यथाशक्ती शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळे हे सर्व मान्यवर विविध क्षेत्रांमध्ये पारंगत झाले .याचे श्रेय सुद्धा गायकवाड महाराजांना जाते .
‘खरे तर !निवृत्ती महाराजांनी प्रथम आपल्या नात्यातील असणाऱ्या तरुण मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आणि त्या कुटुंबांचा विकास घडला. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर्श घेऊन गायकवाड महाराजांचा मोठा मुलगा प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे शिक्षण प्रवाहात आले. प्राचार्य डॉक्टर पांडुरंग यांनी या नात्यातील सर्व मान्यवरांचा आदर्श नजरेसमोर ठेवला. आणि तशी पायवाट केली. त्या वाटेचे ते प्रवासी झाले. या गोष्टीचे अनुकरण इतर लहान भावनांनी केले. आपणही आपल्या मोठ्या भावासारखे शिकले पाहिजे .मोठ्या पदावरती असले पाहिजे .ही खुणगाट मनाला बांधली.त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे शिक्षण आणि शिक्षणातील मोठ्या पदांवरती कार्यरत राहण्याचा मानस कार्यरत ठेवला .
शिक्षण प्रक्रियेचा विचार जर केला. जर नात्यातील मुलांना तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात बाबांनी आणले नसते .तर यदाकदाचित आज त्या असणाऱ्या पिढीचे काय झाली असते. कोण जाणे.? परंतु त्यांनी सन्मार्गाला या तरुणांना आणले. त्यामुळे आज अनेक पिढ्या प्रबोधनाच्या आणि सन्मार्गावर आहेत . ह्या केवळ गायकवाड महाराजांच्या विचारसरणीचे यश म्हणावे लागेल. गायकवाड महाराजांनी अनेक पिढ्या घडविल्या. त्या विचारांचे आपण वारस झाले पाहिजे. असे विचार न कळत त्यांचा मोठा मुलगा पांडुरंग गायकवाड यांच्या मनात आले असावेत.
(क्रमशः भाग 7 पुढील अंगात)