विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचे पथ संचलन.
प्रतिनिधी : सचिन थोरवे
नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव 2024 तसेच आपत्ती व पूर व्यवस्थापनचे अनुषंगाने आज 13/09/2024 रोजी 10/00 ते 12. 30 वा.चे दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशन मैदानामध्ये मॉप डिस्पोजल दंगा काबु योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली व त्यानंतर नारायणगाव येथील नारायणगाव एसटी स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज पुरोवेस-छत्रपती शिवाजी महाराज चौक-हनुमान चौक-पेठ आळी-महा सूर्योदय चौक-इंदिरानगर-मुस्लिम मोहल्ला- पुन्हा नारायणगाव एसटी स्टँड असे पथ संचलन करण्यात आले. त्यामध्ये 2 पोलीस अधिकारी 40 पोलीस अंमलदार तसेच 14 होमगार्ड पाच सरकारी वाहने ,चार अँम्बुलन्स सहभागी झाले होते.
महाराष्ट्र मध्ये गणेशोत्सव आनंदी वातावरणात साजरा होत असताना मनोभावे सर्व गणेश भक्त दहा दिवस गणरायाची सेवा करत असतात परंतु शेवटच्या दिवशी भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देताना मिरवणुकी दरम्यान अनेक पारंपारिक आत्याधुनिक वाद्य डीजे देखील आता मिरवणुकीत वापरतात.
मिरवणुकी मध्ये डीजे च्या आवाजाला मर्यादा घालण्यात आली असून आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी पोलीस यंत्रणा ध्वनी क्षेपणाद्वारे आवाजाची मर्यादा तपासून त्यांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज असल्यास त्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी संबंधित गणेश मंडळांच्या अध्यक्षांची मीटिंग घेऊन त्यांना सूचना दिले आहेत कुठेही कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्याकडून चोख बंदोबस्ताची व्यवस्था देखील विसर्जन ठिकाणी करण्यात आली आहे.