प्रतिनिधी : सचिन थोरवे
नारायणगाव हे पुना नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील एक मोठे शहर संख्या ठिकाणी टोमॅटोचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या ठिकाणी असून गुरुवर्य रा प सबनीस विद्यालय याच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी बेसिस्त वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते.
विद्यालय परिसरात अनेक टवाळखोर शाळा सुटल्यानंतर आपल्या बुलेट गाड्या घेऊन सायलेन्सर च्या आवाजातून मुलींना विनाकारण त्रास देण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दि.26/08/2024 रोजी रा. प. सबनीस विद्यालय तसेच सीनियर कॉलेज येथे रोड रोमियो यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्वतः पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी हजर राहून खालील प्रमाणे वाहतूक केसेस केल्या आहेत त्यांच्या ह्या कारवाईतून लाखो रुपयांच्या दंड देखील वसूल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे पोलीस निरीक्षकएकूण केसेस- 35 एकूण दंड =103500/-₹. 1)ट्रिपल सीट =102)वीना परवाना लाइसेंस=203)सीट बेल्ट कारवाई=034) हेलमेट कारवाई=025) बुलेट चा आवाज आणि fancy नंबर प्लेट कारवाई करून 05 बुलेट पोलीस स्टेशन ला जमा केल्या आहेत.
सदरच्या कारवाईमुळे शालेय विद्यार्थिनींनी आणि पादचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतल्याची चर्चा होत असून सर्वसामान्य नागरिक पोलिसांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त करीत आहे.