शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
व्यापारी संघाच्या आसनाऱ्या सर्व आडी आडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणारं आहे – कमलेश शेठ बुऱ्हाडे कमलेश बुऱ्हाडे यांची पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेच्या सचिव पदी निवड करण्यात आली त्यांना रांजणगाव गणपती येथे निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देन्यात आले निवड जाहीर होताच कमलेश बुऱ्हाडे म्हणाले की पुणे जिल्हा व्यापारी संघटनेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास मी निश्चितच पात्र राहून काम करानार आहे व सर्व व्यापारी संघाच्या आसणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल अशी खात्री त्यांनी दीली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठ कुतवळ ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद, दादा पाटील फराटे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे जिल्हाअध्यक्ष सचिन भाऊ निवंगुणे, जिल्हा परिषद सदस्या सौ स्वातीताई पाचूंदकर ,आणि उद्योजक बापूसाहेब शिंदे ,अशोक शेठ शहाणे, प्रदीपराव मैड, आबासाहेब मैड ,माऊली शेठ शहाणे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन निवगुने , तालुका आधक्ष किरण शिंदे ,उद्योजक भानुदास सरके, व शिरूर तालुक्यातील सर्व व्यापार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता व्यापारी मेळाव्यात व्यापाऱ्याविषयी धोरण व्यापाऱ्यांची विमा व्यापाऱ्यांची सुरक्षा उद्योग व्यवसाय कसा वाढवायचा छोटा व्यवसाय मोठा कसा करायचा याबद्दल अनेक मान्यवरांनी अनेक व्यापाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .व्यापाऱ्यांच्या सुरक्षेला यापुढे जास्त महत्त्व देणार असल्याचे प्रदीप दादा कंद यांनी सांगितले शासन दरबारी व्यापारांसाठी विमा संरक्षण त्याचबरोबर व्यापाऱ्यांविषयीचा सुरक्षेचा विषय दादांनी मार्गदर्शन केले. शिरूर तालुक्यातील सर्व कार्यकिरणीने हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.