शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

यश कीर्ती सामाजिक संस्था अध्यक्षा डॉ.मंगल ताई सासवडे , वैशाली ताई खेडकर सचिव, गीता ताई यमु, संगीताताई विखारे, सुवर्णाताई भुजबळ, मनिषा ताई गडदे सुमनताई माने ,यांच्या मुख्य संकल्पनेतून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राखी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी उपस्थित होते यश कीर्ती सामाजिक संस्था ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, ग्रामीण भाग विकास, अनाथ निराधार मुले तसेच विधवा निराधार महिलांसाठी इत्यादी क्षेत्रात उत्कृष्टरित्या राज्यस्तरीय स्वरूपाचे कार्य करीत आहे.

त्याचबरोबर संस्थेचे शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये तसेच ट्रॅफिक पोलिसांना रक्षाबंधन या पवित्र सणाच्या निमित्ताने एक राखी पोलीस बांधवांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्तव्यदक्ष पोलीस बांधव सहभागी झाले होते. जनतेसाठी पोलीस हे अहोरात्र सेवा देत असतात तरीही त्यांना नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच तत्पर सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधण्यात आली रक्षाबंधन या सणाला रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिले जातं आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खास मानला जातो बहीणीच्या रक्षणाचे वचन देत भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button