“पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी राजकीय दबाव तंत्रामुळे अडचणीत.
शिरूर प्रतिनिधी
सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पक्षाचे लेटर पॅड चा वापर करून पुरवठा विभागाला रेशन मिळणे कामी लेटर पॅडवर अर्ज सादर केला आहे. रेशनचा लाभ स्वतःच्या कुटुंबास मिळवण्यासाठी चक्क पक्षाच्या लेटर पॅड चा वापर करून पुरवठा विभागाला नियमबाह्य काम करण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करून गरीबाच्या टाळू वरील लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या पदाधिकाऱ्याची संबंधित पक्षाने चौकशी करून कारवाई करावी व गरीब, गरजू व उपेक्षितनां न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.सत्ताधिकारी पक्षातील एका पदाधिकाऱ्याने या योजनेचा लाभ आपणास व आपल्या कुटुंबास मिळावा असा अट्टाहास करून या संदर्भात पक्षाच्या लेटर पॅड वर पुरवठा विभागाकडे मागणी करून या योजनेतील निवडीचे निकष व निश्चित केलेला इष्टांक यात बदल करण्यात येऊन आपणास रेशनकार्ड ऑनलाईन करणे आणि व्हेरिफाय करण्यकामी व इतर योजनेचा लाभ मिळवण्याचा आग्रह धरल्याने पुरवठा खात्याचे अधिकारी संभ्रमात पडले असून एकीकडे राजकीय दबाव तंत्राचा वापर तर दुसरीकडे या संदर्भात असणारे निकष तर मूळ लाभार्थी लाभापासून वंचित राहणार अशी स्थिती या पदाधिकाऱ्यांच्या लालचीपना मुळे निर्माण झाली आहे.
पक्षाच्या वरिष्ठांनी या संदर्भात दखल घेऊन सबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी व गरीबाच्या टाळूवरील लोणी खाण्यासाठी व पक्षाला कलंकित करणाऱ्या व्यक्तीकडून अधिकाऱ्यांना नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव तंत्र वापरले जात आहे. अश्या पदाधिकाऱ्याला धडा शिकवला जाईल का?अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.