जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व ईपीएस-९५ पेन्शन धारकांच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दि.:-७ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता आळेफाटा येथे संत सावता महाराज मंदिरात करण्यात आले आहे.अशी माहिती जुन्नर तालुकाध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा संघटक अजितकुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आजवर झालेले काम आणि पुढील कार्याची दिशा या संदर्भात चर्चा करण्यात आली.आळेफाटा येथील मेळाव्याला संघटनेचे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर मार्गदर्शन करणार आहेत.
अगामी काळात पेन्शन वाढी संदर्भात संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार असून पुणे शहरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच ३१ जुलै पासून राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.यासंदर्भात अधिक सविस्तर मार्गदर्शन आणि माहिती ७ जुलैच्या आळेफाटा येथीलमेळाव्यात देण्यात येणार आहे.तरी जुन्नर तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त ईपीएस-९५ पेन्शन धारकांनी सदर मेळाव्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी संघटनेसाठी तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.