जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिल माफ व्हावे यासाठी प्रयत्न केले परंतु काही अहंकारी मंत्र्यांनी ब्रह्मदेव आला तरी तुम्हाला वीज बिल भरावेच अशी तंबीच शेतकऱ्यांना दिली होती . तरीसुद्धा शेतकरी संघटनेने हार मानली नाही आणि सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारकडून न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत असे विनंती शेतकरी संघटना वारंवार करत असताना खऱ्या अर्थाने कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि शेतकरी संघटनांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले.
खरंतर सरकारने आत्ताच कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय का घेतला त्याला कारणही तसेच आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीत मगरूळ आणि अभिमानी तसेच गर्व असलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी मतदान पेटीतून आपले मत हुकूमशाही सरकारला न देता जो शेतकऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला त्यालाच शेतकऱ्यांनी मतदान केले आणि सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
विज बिल माफ केले म्हणजे शेतकऱ्यावरती सरकारने उपकार केले नाहीत तर अनेक कराच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याकडून होत असलेल्या खरेदीतून अनेक कर लावून त्याचे वसुली सरकार करत असते खरंतर आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे. सरकारने पुढील विधानसभा निवडणुकीत आपल्याला फायदा होणार हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच कृषी पंपाचे वीज बिल माफ केले असले तरी शेतकऱ्यांचे अजून अनेक प्रश्न प्रलंबित असून मागील वर्षाचे पीक विम्याची रक्कम सरकारने शेतकऱ्यांना दिली नाही शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्यातही सरकारने दुजा भाव केला आहे कांदा निर्यातीचा प्रश्नही अजून मार्गी लागलेला नाही.
शेतकऱ्याला खते आणि बियाणे देण्यातही सरकार असक्षम ठरलेले असून सरकारने चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यास भविष्यात शेतकरी सरकारला नक्कीच त्यांची जागा दाखवून देईल असे मत पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे त्याचप्रमाणे जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ आणि युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी व्यक्त केले आहे.