जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
नवरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे यांच्या सर्वोत्कृष्टता केंद्राच्या वतीने घेतली जाणारी इयत्ता आठवी, नववी, दहावीची महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (एमटीएस) मंगळवारी दि:-२३ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे या परीक्षेचे समन्वयक बी. आर. खाडे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना खाडे म्हणाले की, यावर्षी ही परीक्षा शनिवारी दि:-२०एप्रिल रोजी होणार होती.परंतु लोकसभेच्या निवडणुकांमुळे आता ही परीक्षा महाराष्ट्र गोव्यासह मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत होणार आहे. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. स्पर्धा परीक्षेच्या चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व भावी काळातील स्पर्धा परीक्षांची पायाभरणी या परीक्षेच्या माध्यमातून करावी.
त्याचप्रमाणे आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी भावी काळात करावा,अशा प्रकारची संकल्पना या परीक्षेच्या पाठीमागे आहे. जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर, आळे, बेल्हे, नारायणगाव, जुन्नर अशी परीक्षा केंद्रे असून, ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट होत आहेत.