(आदिवासी बांधव डॉ.कोल्हे यांच्यावर नाराज)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शिरूर,परभणी,धाराशिव,दक्षिण मुंबई,ठाणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि बारामती या मतदारसंघात मागील पंचवार्षिक खासदार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असून या लोकप्रतिनिधी खासदारांना या मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा निवडून का द्यावे? असा प्रश्न या मतदारसंघातील मतदारांना निर्माण झाला आहे.या लोकप्रतिनिधीच्या बाबत आता विचार करण्याची वेळ आली आहे असा इशारा जागरूक मतदार,जाणकारांनी व तज्ञांनी दिला आहे. खास करून शिरूर आणि बारामती मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी डोळे उघडे ठेवून मतदान केले पाहिजे.सूत्रांच्या माहिती नुसार शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे, यांनी ८०% तर बारामती मतदार संघातील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी जवळपास ६८% चक्क वाया घालविल्याचे चित्र आहे.निधी मिळून सुद्धा केवळ मतदारसंघात आदिवासी भागातील दत्तक घेतलेल्या गावाची कामे न केल्यानेच सर्व निधी वाया गेला आहे.
मोदी सरकारच्या विविध योजना उपक्रम वगळता या खासदारांना मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी खासदार निधी म्हणून गेल्या पाच वर्षात वेगळे पाठवले होते.हा सर्व निधी कसा खर्च करायचा याचे सर्वाधिकार या खासदारांना होता.जर हा निधी संपला तर अधिक निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याची तयारी मोदी सरकारने या खासदारांना देण्याचे आदेश दिले होते. तशी नियमात तरतूद केलेली आहे असे असताना देखील मतदारसंघात या खासदारांना कामे केली नाही.एवढा मोठा निधी केंद्र सरकारने खासदारांना उपलब्ध करून दिलेला असताना खासदारांनी निधी वापरलाच नाही,का?
या मतदारसंघात विकास कामे शिल्लकच नाहीत का? या मतदारसंघात पूर्ण विकास कामे झाली आहे का? पैसे मिळत असताना आणि ते खर्च करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असतानाही जर ही खासदार मंडळी जनतेच्या हिताची कामे करू शकत नसतील तर हा कर्म दरिद्रीपणा नाही तर आणखी काय ? ही त्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान नाही का?
:–आदिवासी मतदारसंघात डॉ.कोल्हे यांच्या विषयी प्रचंड नाराजी–:
शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आम्हा आदिवासी जनतेची पूर्णतः फसवणूक केली असून त्यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे-जांभुळशी हे आदिवासी गाव दत्तक घेतले मात्र या भागातील मूळ पाणी प्रश्न त्यांना अद्यापही सोडवता आला नाही शिवाय पाच वर्षात खासदार म्हणून कधीही भेट दिली नाही ज्या भेटी झाल्या त्या केवळ वर्तमान पत्रात पिण्याच्या पाण्याची वास्तव दर्शविणाऱ्या बातम्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी बांधवांचे त्यांना कधीच काळजी घेतली नाही.या आदिवासी भागातील अनेक मतदारांना खासदार कोण आहे हेच माहिती नाही. त्यामुळे विद्यमान खासदार म्हणजे फक्त बोलका पोपट आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यातील उत्तर,पश्चिमेकडील आदिवासी बांधव नाराज आहे कोपरे-जांभुळशी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यात येईल असा निर्धार केलेला असताना पाच वर्षे साधा टँकर देखील सुरू करता आला नाही एमआय टॅंक बांधण्याची आश्वासने देऊन तुमचा पिण्याच्यापाण्याचा प्रश्न कायमचासोडविण्यात येईल अशी आदिवासी बांधवांची दिशाभूल करून मते मिळविली मात्र कोणत्याही प्रकारची विकासकामे आमच्याकडे झाली नाहीत हे आमचे दुर्दैव आहे दत्तक गावाला वेगळा विशेष निधी नसतो असे वारंवार सांगितले जात होते मुळातच खासदार निधीलाच यांना न्याय देता आला तर विशेष निधी कुठे वापरला असता ?
:-आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान–: