प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून आधुनिक काळातही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे मत “महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार व शिक्षणातील योगदान” या विषयावर बोलताना पुणे जिल्हा टीडीएफच्या अध्यक्षा हर्षाताई पिसाळ /निगडे यांनी पुणे विभाग टीडीएफ आणि पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघ आयोजित शैक्षणिक विचार मंथन व्याख्यानमालेत केले केले. पिसाळ पुढे म्हणाल्या की महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक विचार व शिक्षणातील योगदान याच्या आधुनिक पिढीला दिशादर्शक अशा प्रकारचे आहे.
कार्यक्रमाला टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी.के. थोरात,राज्य विश्वस्त के एस ढोमसे, पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे,पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश खोत,पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सचिन दुर्गाडे,प्रा.जितेंद्रकुमार थिटे,पुणे विभाग टीडीएफचे सचिव मुरलीधर मांजरे,पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते संतोष थोरात,पुणे विभाग टीडीएफचे प्रवक्ते शशिकांत शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद साळुंखे,प्रमुख व्याख्यात्यांची ओळख स्वाती उपार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.मंगलताई शिंदे यांनी तर आभार शशिकांत शिंदे यांनी मानले