जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापुर ता:-जुन्नर येथील शबनम जावेद मोमीन हिने आपल्या स्वतःच्या पती जावेद आबु मोमीन,भाया आयुब आबु मोमीन आणि जाव शरिफा आयुब मोमीन यांच्या विरोधात मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने व स्वतःच्या मुलांना आईच्या मायेला पोरके करून आईला घरातून बाहेर काढलेचे कारणास्तव आळेफाटा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती स्वतः शबनम हिने दिली.
याबाबत सविस्तर माहिती मिळाली की शबनम हिचा विवाह उदापुर येथील जावेद मोमीन याच्याशी २००७ मध्ये मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे झाला असून सुरुवातीला हे सर्व कुटुंब एकत्रितपणे रहात होते मात्र जावेद हा फर्निचर कारागीर असल्याने आमचा संसार एक महिना व्यवस्थित चालला होता मात्र त्यानंतर जाव शरीफा व भाया आयुब यांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली या घरात तू राहू नकोस असे धमकी देण्यास सुरुवात केली. त्यातच मला उपाशी ठेवणे,रात्री अपरात्री घराबाहेर काढणे असा त्रास देण्यास सुरुवात केली. परिणामी मी व माझे पती आम्ही गावातच दुसरी खोली भाड्याने घेतली त्यांनतर आम्हाला दोन अपत्य रिहान व सोहेल झाली. २०१२ साली जावेदला जुगाराचा नाद लागला व त्यामुळे तो उशिरा घरी येणे घरात चिडचिड करणे इत्यादी त्रास सुरू झाला याला कारणीभूत माझा भायाच असल्याचे सांगितले कारण आयुब हा दोन नंबरचे काम करीत आहे व तो पती जावेदला पत्ते खेळण्यास घेऊन जात होते. परिणामी जावेदला कर्ज झाले व घरात भांडणे सुरू झाली. नातेवाईक लोकांनी पतीला समजावून सांगितले मात्र आयुब व शरिफा यांनी त्याला पतीला व मुलांना माझ्याविरुद्ध भडकावले परिणामी आमच्यात वितुष्ट निर्माण झाले. त्यानंतर माझे पती जावेद यांनी माझे चारित्र्यावर संशय व्यक्त केला आणि माझा छळ सुरू केला त्यानंतर मला घरातून बाहेर काढून माझे दागदागिने काढून घेतले,घरातील संसार उपयोगी सर्व समान ठेवून घेतले आणि माझ्या कडील रोख रक्कम २५३००/-रुपये हिसकावून घेतले. परिणामी मी सध्या एकटीच पडल्याने व माझे भाया व जावं उदापुर गावात भाड्याने खोली देखील घेऊ देत नाही त्यामुळे मी सध्या आळेफाटा येथे भाड्याने खोली घेऊन रहात आहे.
याबाबत मी ओतूर पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार दाखल करण्याची विनंती केली मात्र माझ्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे मी आळेफाटा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बी.वाय.लोंढे करीत आहेत.