जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे
कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार नारायणगाव येथे मांजरवाडी रोड च्या बाजूला टोमॅटो मार्केट असून मार्केटच्या पश्चिमेच्या बाजूने पुणे नाशिक हा हायवे जात असल्यामुळे आणि मांजरवाडी रोड हा अष्टविनायक ला जोडणारा रोड असल्यामुळे रस्त्यावर कायम गर्दी असते परंतु रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने या ठिकाणी धना मेथी घेऊन येणाऱ्या गाड्या त्याचप्रमाणे टोमॅटो भरण्यासाठी पर राज्यातून आलेल्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या केलेल्या असतात त्यामुळे रस्त्यावरनं दुचाकी आणि चार चाकी वाहनांना जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होऊन अपघात घडण्याची दाट शक्यता अनेक दिवसापासून वर्तवण्यात येत होती परंतु यावर कुठलाही ठोस निर्णय बाजार समितीने आतापर्यंत तरी घेतला नव्हता परंतु नारायणगाव पोलीस स्टेशनला एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शेलार साहेब लाभले आणि त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्याबरोबर त्यांनी बाजार समिती प्रशासनाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी रस्त्याच्या बाहेर उभे राहणाऱ्या गाड्यांसाठी आपण पार्किंगची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे आपण टोमॅटो भरण्यासाठी येणाऱ्या बाहेरील राज्यातील गाड्यांची माहिती आपण ठेवावी बाजार समिती परिसरात नाईट कॅमेरे बसवावेत त्याचप्रमाणे परप्रांतीय कामगार या ठिकाणी कामासाठी येत असतात त्यांची नोंद असणे गरजेचे आहे ती ठेवावी व त्यांची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी असेही त्यांनी सांगितले शेलार साहेबांनी या घेतलेल्या निर्णयामुळे बाजार समिती बाहेरील वाहतूक कोंडीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे परंतु बाजार समितीने यावर लवकर योग्य तो निर्णय घ्यावा तसे न केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर आणि त्या वाहनावर पोलीस प्रशासन कारवाई करणार शेलार साहेब हे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचं काम करतात त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलीस प्रशासना विषयी आदर निर्माण होत आहे यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडागळेनिवृत्ती शेठ काळे संचालिका शेळके ताई या बैठकीसाठी उपस्थित होत्या