न्हावरा येथे ग्रामसंघाच्या महिला प्रशिक्षण वर्गात कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना लाभ घेऊन उद्योजक बनण्याचे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केलेन्हावरा येथे शिल्पा ब्राम्हणे मॅडम व दादासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महिला प्रभाग संघाचे आर्थिक व्यवस्थापन 3 दिवशीय प्रशिक्षणात कृषी सहायक यांनी महिलांना उद्योग क्षेत्रात असलेल्या संधी व पीएमएफएमई अंतर्गत खाद्य उद्योग जसे कि पापड फरसाण दुग्धजन्य पदार्थ पासुन पनीर बनविणे मसाला उद्योग शेवई उद्योग तेलघाणा बेफर्स बनविणे आल लसुन पेस्ट बनविणे दाळ मिल पोहे मिल बेकरी पदार्थ असा विविध उद्योगास पीएमएफएमई अंतर्गत 35 टक्के अनुदान बाबत सविस्तर माहिती कृषि सहायक जयवंत भगत यांनी दिलीतसेच ए आय एफ योजना स्मार्ट योजनांची माहिती देण्यात आली पौष्टिक तृणधान्य अभियान चालू असल्याने आहारातील तृणधान्याचे महत्व विशद करताना राळा नाचणी ज्वारी बाजरी वरई इत्यादि तृणधान्य चे आहारातील महत्त्व सांगताना शरीरात ग्लुटेनची आवश्यकता फार कमी असुन जास्तीचे ग्लुटेन तयार झाल्यास कसे अपायकारक ठरते याबाबत हि माहिती दिली.कार्यक्रमासाठी मांडवगण फराटा सादलगाव इनामगाव आलेगाव रांजणगाव गुनाट निमोणे न्हावरा निर्वी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्याकार्यक्रमासाठी शिल्पा ब्राम्हणे व दादासाहेब शिंदे सह जयवंत भगत यांनी योगदान दिले तर आभार मनिषा गायकवाड यांनी आभार मानले.