जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून, आगामी काळात किती पाऊस पडतो या आधारे या वेळा पत्रकात कमी- अधिक बदल करावा,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत निश्चित करण्यात आले. या बैठकीस राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार रोहित पवार,संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दूरदृष्यप्रणाली द्वारे,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा -चे कार्यकारी संचालक अतुल कपोले,मुख्यअभियंता वि. प्र.हेमंत धुमाळ,अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले जुलै २०२३ पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे,अहमदनगर,सोलापूर जिल्हाधिकाऱ्यां- नी नियोजन करावे.उर्वरित पाणी रब्बी पिकांना देण्या- बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.तसेच टँकरसाठी पाणी स्रोत आदींचे नियोजन करावे लागेल, हवामान विभागाने दोन चक्रीवादळे तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे पाऊस पडू शकतो,असे सांगितले.त्यानुसार पुढील काळात किती पाऊस पडतो हे पाहून सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या तारखात लवचिकता ठेवावी लागेल. कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामे तातडीने करून घ्या.त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल पाणीपट्टी वसूल करून त्यातील ठरावीक रकमेतून पोटचाऱ्या दुरुस्ती करून घ्याव्यात,पाणीवापर संस्थांनाही फाटे, चाऱ्या स्वच्छ करण्यास सांगावे.चार तालुक्यांतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश पवार यांनी दिले.या प्रकल्पातून पुणे,अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात.सर्व भागांत,पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे,असेही त्यांनी सांगितले.घोड प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे,त्यामुळे घोड उजवा व डावा कालव्यातून रब्बीची दोन आवर्तने आणि उन्हाळी एक आवर्तनाचे नियोजन असून, पहिले आवर्तन २५ डिसेंबरच्या आसपास सोडण्यात येईल,असे या वेळी निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी कमी पावसामुळे जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींमध्ये पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा सुमारे सव्वा मीटरने खाली गेल्याचे सांगितले. या वेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत सहकारमंत्री वळसे पाटील यांनी तसेच उपस्थित आमदारांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरुवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी कुकडी प्रकल्पात सध्या ९० टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले तसेच प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button