जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन केल्यास अनेक लोकांचे प्रश्न सोडविले जाऊन पोलीस विभागाबाबत विश्वास निर्माण झाला आहे.यामुळे सर्व तक्रारींचे निवारण होऊ शकते हे सचिन कांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे त्याचेच एक उदाहरण समोर आले आहे. विठ्ठल सूर्यभान बोंबले, रा.भोरवाडी ता:- जुन्नर, जि.पुणे यांचे वापरते विवो व ओप्पो कंपनीचे असे २ मोबाईल दिनांक १९/१०/२०२३ रोजी उदापुर बनकरफाटा ते भोरवाडी परिसरात गहाळ झालेअसले बाबत त्यांनी ओतुर पोलीस स्टेशन येथे मोबाईलगहाळ झाल्याची तक्रार नोंदवली होती.त्याप्रमाणे ओतुर पोलीस स्टेशनने तांत्रिकदृष्ट्या माहीती प्राप्त करून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करून ते विठ्ठल सूर्यभान बोंबले यांना परत केले आहेत.यामुळे ओतूरपोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांच्या टीमचे परिसरातून कौतुक होत आहे.