जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील मांडवे ता:-जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील एकूण ४० विद्यार्थ्यांना शूज,वही,पेन,टूथब्रश, या शालेय वस्तूंचे वाटप ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्यामार्फत वाटप करण्यात आले. यापूर्वी सचिन कांडगे यांनी ऐन उन्हाळ्यात या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता त्यावेळी स्वतः पाण्याचे टँकर घेऊन कोपरे,मांडवेमुथाळणे,याआदिवासी बांधवांची तहान भागविण्या साठी पुढाकार घेतला होता.कांडगे हे या आदिवासी भागातील सामाजिक कार्य करणारे आतापर्यंतचे पहिलेच पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या या उदात्त विचारसरणीमुळे आदिवासी भागातील लोक त्यांना आपले मानतात. सदर वेळी स.पो. नि.सचिन कांडगे सो.यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले असून उपस्थित पालक तसेच ग्रामस्थ यांना गावात आपापसांत भांडणतंटे करू नये,सायबर क्राईम प्रतिबंध उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.सदर वेळी शिक्षक सुनिल चौधरी,सरपंच दामोदर गोडे, पोलीस पाटील बबन दाभाडे,माजी पोलीस पाटील संतू बुधा ठोंगिरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान दाभाडे, ग्रामपंचायत शिपाई अंकुश दाभाडे तसेच ओतूर पोलीस स्टेशन चे पो.हवा.पठारे,लांडे व पोलीस मित्र सूरज पानसरे असे उपस्थित होते.