टाकळी हाजी (प्रतिनिधी)

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, समग्र शिक्षा व प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा सन 2023- 24 मध्ये यशस्वी झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ पेंग्विन सभागृह वीर माता जिजाबाई उद्यान भायखळा येथे आयोजित करण्यात आलेला होता.राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र,पुणे यांच्या मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता, मुंबई उपनगरातील बोरवली तालुक्यातील सखाराम तऱ्हे मार्ग इंग्लिश शाळेचे आदर्श शिक्षक कृष्णा निवृत्ती कोकाटे यांनी सहावी ते आठवी या प्रवर्गातून विज्ञान या विषयासाठी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून त्याचे वितरण बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रकल्प अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम तीन हजार रुपये,सोन्याचा मुलामा दिलेले सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ असे होते.आदर्श शिक्षक कोकाटे यांचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे, विद्यार्थ्यांच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,त्यांच्या या यशाबद्दल मुंबई उपनगरातील सखाराम तऱ्हे शाळेच्या मुख्याध्यापिका निरंजना छोवाला मॅडम, उमेश नलगे सर, दिगंबर शेळके सर आदी शिक्षक वृंदाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button