प्रतिनिधी जिजाबाई थिटे

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यात लोकशाही शिक्षक आघाडी नेहमी अग्रभागी असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक लोकशाही आघाडी राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याचे अध्यक्ष शिक्षक नेते जी.के.थोरात होते. अधिवेशनाच्या प्रथम सत्रामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यावर आपले मत व्यक्त केले व भविष्यात या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींना दिले.महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर भरती, शिक्षकांची अशैक्षणिक कामे,पवित्र पोर्टल, निवड श्रेणी,पेसाअंतर्गत भरती या व अनेक समस्या उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या तसेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याबरोबर लोकशाही शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र मीटिंगचे आयोजन करून त्या सोडवण्याबाबतचे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीच्या अपरांत या स्मरणिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री महोदयांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले राज्याचे अध्यक्ष जी.के.थोरात व कार्याध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.शिक्षक हा समाज परिवर्तन प्रक्रियेतील प्रमुख घटक असून त्याचे मोलाचे योगदान असल्याचे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले.अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के. थोरात संघटनेची गरज व महत्त्व स्पष्ट करून म्हणाले की भविष्यामध्ये शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडी कटिबद्ध राहणार असून शिक्षकांच्या हक्कासाठी अविरतपणे संघर्ष करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन देखील उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना त्यांनी यावेळी केले.अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,महाराष्ट्र राज्य लोकशाही शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षकांच्या समस्यासंदर्भात सहकार्य करण्याचे व ते सोडवण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव के.एस.ढोमसे यांनी शिक्षकांच्या प्रश्नसंदर्भात राज्यभर जागृती करणार असल्याचे यावेळी सांगितले.अधिवेशनात उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत,मा.मंत्री राजेंद्र गावित,खासदार डॉ.हेमंत सावरा,आमदार निरंजन डावखरे,मा.आमदार राजेश पाटील,शिक्षणाधिकारी संगीता भागवत, महाराष्ट्र राज्य लोकशाही शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के.थोरात,सचिव के.एस ढोमसे यांच्या यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण ६ शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामठे तसेच राज्य कार्यकारणीच्या सदस्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.राज्यभरातून २५०० पेक्षा जास्त शिक्षक बंधू भगिनी या अधिवेशनासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवेशनाचे महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष नरसू पाटील यांनी केले. कार्यक्रमाला जीवन विकास शिक्षण संस्था आणि शिक्षण महर्षी स.तु. कदम विद्यालय आणि सर्व संकुलाचे प्रमुख वागेशजी कदम तसेच सर्व संचालक मंडळ, कोकण कोकण विभाग प्रमुख सागर पाटील, संतोष पावडे,पालघर जिल्हा अध्यक्ष गणेश प्रधान,पुणे विभाग प्रमुख शिवाजीराव कामठे,पंकजराव घोलप,सुनीलराव राजेनिंबाळकर,नामदेव पाटील,मायकल गोन्सालवीस,प्रमोद पाटील व सर्व राज्य कार्यकारणी सदस्य,पालघर,ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button