सरडवाडी:-सरदवाडीचे मा.उपसरपंच उद्योजक मा.श्री.गणेश सरोदे आणि त्यांच्या पत्नी सौ.कोमल सरोदे यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले,त्यांनी या कन्यारत्नाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले , या दांपत्याने अभिनव विद्यालय सरदवाडी मधील इयत्ता ६ वी मध्ये शिकत असलेला दिव्यांग विद्यार्थी कु.अमोल बापू गुलदगड या विद्यार्थ्यांला एक सायकल भेट देऊन केले,हा विद्यार्थी रामलिंग नगर(क-हे वाडा)या ठिकाणी राहतो.त्या ठिकाणाहून विद्यालयाचे अंतर खूप जास्त आहे.त्याची अडचण लक्षात घेता या दांपत्याने आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत करताना हा अनोखा कार्यक्रम घेतला .या त्यांच्या कार्याचे शिरूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. नुकतीच सायकल कु.अमोल बापू गुलदगड या विद्यार्थ्यास मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली . या वेळी मा श्री.आबासाहेब सरोदे (पंचायत समिती सदस्य,) श्री नामदेवदादा सरोदे (मा उपसरपंच),सौ.लक्ष्मीताई जाधव (लोकनियुक्त सरपंच सरदवाडी), श्री.गणेश सरोदे (मा.उपसरपंच ),विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दादाभाऊ घावटे सर श्री.उमेश सरोदे ( ग्रा.पं सदस्य),सौ विद्या सरोदे (ग्रा.पं सदस्या) सौ.शिल्पाताई घावटे (ग्रा.पं.सदस्या),ह.भ.प.बापुमहाराज घावटे,युवाउद्योजक श्री.गणेश निचित ,श्री.कैलास सरोदे मा.अध्यक्ष जि .प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती ,श्री.दिपक सरोदे (पांडुरंग उद्योग समूह) श्री.रूपेश निरवणे (मोरया मेडिकल) ,श्री.अनिल घावटे (साई समर्थ मेडिकल) ,बाळासाहेब जाधव (मा.ग्रामपंचायत सदस्य)श्री.हनुमान सरोदे सर ,शांताराम खामकर सर ,श्री संदीप सरोदे सर , गि-हे मॅडम,सौ. सविता रासकर मॅडम ,सौ.मनिषा पवारमॅडम श्रीमती रुपाली कदम ,श्रीमती आरती शेळके,श्रीमती राणी मांडगे मॅडम,सौ.दीपाली शिंदे मॅडम, श्री.गजानन गोंजारी सरश्री.भूषण कारकुड सर आणि ग्रामस्थ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक श्री.घावटे दादाभाऊ सर यांनी केले तर ,उपस्थितांचे स्वागत श्री.संदीप सरोदे सर यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब जाधव यांनी मानले.