श्री क्षेत्र वाडे बोल्हाई कोकणात दशावतार हे एक पारंपरिक लोकनाट्य आहे, ज्यात भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे ( मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्कि ) सादरीकरण केले जाते.

वाडे बोल्हाई या गावामध्ये खुप जुन्या काळापासुन सोंगा चा कार्यक्रम केला जातो . त्यामध्ये प्रथम सकाळी देवीचा अभिषेक केला जातो , त्यानंतर सायंकाळी आईसाहेबांचा ९ वा छबिना निघतो , छबिना संपला की, पारंपारिक सोंगाचा कार्यक्रम सुरू होतो , त्यामध्ये गणपती बाप्पा ,श्री हनुमान , रावण व काही वर्षांपासून चालत आलेले सोंग चेंडवाल , गोंडवाल , झाडु मेस्ती ,शारदा असे विविध प्रकारचे सादरीकरण केले जाते . गावातील दक्षता तरूण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते . त्यात वयस्कर लोकां पासुन ते तरुण पिढीची मुलं या पारंपारीक कार्यक्रमात सहभाग दाखवतात . अशी माहिती शंकरराव साळुंके यांनी दिली .

हा वाडे बोल्हाई चा यात्रोत्सव खूप उत्सव वर्धक पद्धतीने साजरा केला जातो ,सोंगांमध्ये स्वराज भालेकर , सुयोग भालेकर , ओमकार भालेकर , शिवार भालेकर , पंढरीनाथ भालेकर , सनी भालेकर, भगवान, जाधव , शिंदे , साळुंके , गाडेकर , पाचंगे , कुंभार , सावंत हि लोक हिरहीरीने भाग घेतात, यात्रेच्या दिवशी महाराष्ट्रातील भक्त भाविक लाखोंच्या संख्येने देविचे दर्शन घेतात.रात्री लोकनाट्य चे ही आयोजन केले जाते,अशि माहिती दक्षता युवा मंडळातील सदस्यांनी दिली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button