प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या इंटरनल ऑडिटरपदी श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागाचे प्राचार्य श्री तुकाराम बेनके यांची निवड झाली. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाची वार्षिक सभा मुख्याध्यापक संघ कार्यालय पंधरा ऑगस्ट चौक सोमवार पेठ येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये सन 2025 ते 28 साठी कार्यकारणी मावळते अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त अरुण थोरात ,शिवाजीराव किलकिले,हनुमंत कुबडे याच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून प्रसाद गायकवाड ,कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव शिवाजीराव कामथे तर सहसचिव मारुती कदम यांची निवड करण्यात आली.तुकाराम बेनके हे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे पाच वर्षापासून अध्यक्ष असून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सेकंडरी पतसंस्था लि.मुंबई या पतसंस्थेचे संचालक आहेत. अनेक शैक्षणिक चळवळीत सहभाग घेतला असून जुन्या पेंशन योजनेचे ते महाराष्ट् राज्य समन्वयक म्हणून काम पाहतात.
[पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या इंटरनल ऑडिटरपदी निवडीने गेली 25 वर्षे शैक्षणिक चळवळीतकेलेल्या कामाची पोहचपावतीआहे. निष्ठेनेकाम केल्यानंतर निश्चित न्याय मिळतो.सर्वांचा विश्वास संपादित करुन जिल्हा मुख्याध्यापक संघात काम करण्यात येईल.
प्राचार्य तुकाराम बेनके