गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
ता.३१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती शिरूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिरूर पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक प्रशांत ढोले शिरूर पंचायत समिती माजी सभापती दादासाहेब कोळपे ,शिरूर नगरपालिका नगराध्यक्षा मनिषाताई गावडे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे,जि.प माजी सदस्य राहुल पाचरणे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष रवी बाप्पू काळे आदी मान्यवरांनी अभिवादन करून मानवंदना दिली. याकार्यकमासाठी सरपंच कृष्ण गुलदागड ,सरपंच मनीषाताई जाधव. कोळपे सर तगड साहेब व कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.