शुभम वाकचौरे
शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द गावामध्ये मुख्य कार्यालय असलेल्या श्री गुरूनाथ पतसंस्थेला अहवाल सालामध्ये २५ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन नवनाथ राऊत सर यांनी दिली. २४ वर्षापूर्वी संस्थेची स्थापना करण्यात आली. सध्या ५ शाखांच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज सुरू आहे. सध्या संस्थेचे भाग भांडवल ९२ लाख ४२ हजार, निधी ८४ लाख ७७ हजार, गुंतवणूक ६ कोटी १२ लाख, ठेवी १२ कोटी १० लाख, कर्ज येणे ९ कोटी ६९ लाख, कायम मालमत्ता २९ लाख ५८ हजार, नफा २४ लाख ८१ हजार, एकूण उलाढाल २० कोटी ९८ हजार, एनपीए 0 टक्के, वसुली ९२ टक्के असा संस्थेच्या प्रगतीचा अहवाल आहे. २४ वर्षात संस्थेने गरुड झेप घेत जनसामान्यांचा विश्वास संपादन करत १५ कोटी ठेवीचा टप्पा लवकरच गाठत आहे. अनुभवाचा वापर संस्थेच्या विकासासाठी करत आहोत. मेहनत, विश्वास, निस्वार्थीपणावर संस्था चालते. अनुभवी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग विश्वासू संचालक मंडळ सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत संस्थेची यशस्वी घोडदौड वेगाने सुरू असल्याचे संस्थापक चेअरमन नवनाथ राऊत सर यांनी सांगितले.संस्थेची मुख्य वैशिष्ट्ये १. ग्राहकाभिमुख व तत्पर सेवा २. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग ३. तत्पर सेवा ४. कोअर बँकिंग प्रणाली ५. संगणकीकृत संस्था ६. सर्व शाखा मुख्य कार्यालयाशी सी सी टी व्ही द्वारे ७. आय एस ओ मानांकन प्राप्त संस्था ८. ऑनलाइन वीज बिल भरणा QR कोड सुविधा उपलब्ध ९. RTGS/NEFT सुविधा १०. दररोज सोनेतारण अशी माहिती व्यवस्थापक राजेंद्र उंडे यांनी दिली.