गोलेगाव ता.शिरूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावठाण येथील गाव तळे पूर्णपणे भरले आहे. पावसाच्या संततधारामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गावतळ्याने धोक्याची पातळी पार केली. याबाबत गोलेगाव येथील ग्रामस्थांनी पोलीस पाटील संदिप भोगावडे व उद्योजक तुषार पडवळ यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. गोलेगावचे संदीप भोगावडे व तुषार पडवळ यांनी तत्काळ तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व कामगार तलाठी अंकुश सुपे याच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच शिरूर कामगार तलाठी अंकुश सुपे यांनी तळ्याची पाहणी केली.त्यानंतर तळ्यातील अतिरिक्त पाणी ग्रामपंचायत गोलेगाव यांच्या सहकार्यातून जेसीबी मशीनने मोठी चारी खोदून एका बाजूने पाणी सोडण्यात आले. यामुुळे मोठा अनर्थ टळला.याबद्दल उद्योजक तुषार पडवळ ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी पोलीस पाटील संदीप भोगावडे याचे ग्रामस्थानी आभार मानले. यावेळी पोलीस पाटील संदिप भोगावडे उद्योजक तुषार पडवळ स्वप्निल पडवळ तुळशीराम पवार राजू पडवळ किसन पवार अक्षय वाखारे शरद कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी सुरज माकर उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button