शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार

परीक्षक,समीक्षक,तसेच रसिक मायबाप यांचे नाते माझ्या रक्ताशी असल्याचे मत सनई सम्राट सुनील विष्णू बर्वे मु.पो.पिंपळगाव रोठा ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. त्यांना दोन मुली असून ,आईचे नाव सोजर बाई असे आहे .त्यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून सनई ऐकण्याचा व वाजवण्याचा छंद लागला, बालपणातच पिंपळाच्या पानाच्या पुंगळ्या करून, दिवसभर तोंडात धरून ,त्यातून येडे, वाकडे स्वर काढायचे आणि गुणगुणत राहायचं, जसे जसेमोठे झाले ,तसतशी ही सनई वाद्याची कला त्यांच्या अंगी अवगत झाली. त्यातूनच सदाजी भाऊ थोरात ,बशीर भाई बेल्हेकर, कादरभाई बेल्हेकर, इस्माईल भाई बेलेकर, चंद्रकांत गायकवाड दरोडीकर…. यांच्याकडून थोडे थोडे शिक्षण घेऊन हे सर्वजण त्यांचे गुरु झाले. आता सुनील भाऊ सनई वाद्यात चांगलेच तरबेज होऊन, पुणे जिल्ह्यात नावाजले ,त्यांनी सप्त हिंदकेसरी मानाचा तुरा सनई सम्राट आणि गौरव सोहळा सनई सम्राटांचा. इत्यादी पुरस्कार पटकावले .आपल्या सनईच्या वाद्यातून वाजवण्याचा पारंपारिक बाज म्हणजेच गण, गौळण ,लावण्या, अभंग, कवाली, भीम गीते ,आराध्य गीते, क्लासिकल संगीत आणि राग धारी प्रकार ,इत्यादी प्रकार वाजून ,आरोह आणि आवरह हे सुद्धा तान छेडावे लागतात .हे अगदी खरं…. सुनील भाऊ म्हणतात की, सनई वाजवताना खूप वेदना जाणवतात ,ताल स्वर, लय .श्वास रोखून हे वाद्य वाजवावे लागते .वाजवण्याच्या ध्वनीत जाऊन ,तोच स्वर छेडावा लागतो. कारण हे वाद्य वाजवणे म्हणजे सोपे नाही. सनई वाजवताना घसा कोरडा, सतत पोट दुखणे ,हा त्रास नेहमी जाणवतो. कारण श्वास रोखून सर्व स्वर काढावे व छेडावे लागतात. हे अगदी नक्की …….हे वाद्य वाजवताना रसिक क्लासिकल गाण्यांची मागणी करतात. कारण या सनई ताफ्यात चार ते पाच जणांचा ग्रुप असतो .हे वाद्य ऐकताना खूप गोडवा जाणवतो. काही ठिकाणी तर रसिक मायबाप सनई वाद्य वर पैशाची उधळण करतात आणि गाण्यांची वन्स मोर मागणी करतात.हे बऱ्याच ठिकाणी जाणवले आहे. सनई वाजवताना शाब्बासकीची थाप रसिक सुनील भाऊंच्या पाठीवर मारतात .हा फार मोठा त्यांना अनमोल असा पुरस्कार आहे ,असे सुनील भाऊ म्हणतात. ते पुढे म्हणाले की, आम्ही वाद्य वाजवीत असताना, रसिक मायबाप, आमच्या तालावर नाचले की, तोच आनंद आम्हाला खूप खूप मिळतो, तीच आमच्या कलेची खरी पावती होय .आणि परमेश्वराने प्रत्येक माणसाला वेगवेगळी कला अवगत करून दिलेली आहे. त्यातीलच सनई वाद्याचा अनमोल ठेवा परमेश्वराने आम्हाला दिला. हे आम्ही आमचे भाग्य समजतो. . सुनील भाऊंची राहणी साधी असून ,उंच विचार आहेत . रसिकांची सेवा नम्रतेने, प्रेमाने आणि आपुलकीने करतात. सर्व कलाकारावरती प्रेम ,सद्भावना, खरे बोलणे ,नम्रता. इत्यादी सर्व गुण सुनील भाऊंच्या अंगी आहेत. एक सनई वाद्य सम्राट म्हणून, आज त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत आहे. हे अगदी नक्की ……40 वर्षापासून रसिकांची ते सेवा करीत आहेत. आज त्यांचे वय 50 वर्ष आहे .खरंच त्यांच्या हातून, रसिकांची सेवा घडो, त्यांना उदंड आयुष्य मिळो, महाराष्ट्रात त्यांचे नाव झळकत राहो. हीच ईश्वराचरणी प्रार्थना……. लेखक .शाहीर खंदारे तालुका नेवासा 860555 84 32.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button