प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
शिक्षणातील आधुनिक संकल्पना शिक्षकांनी आत्मसात करणे आवश्यक असून विविध क्षेत्रांमध्ये क्षमता असणारा विद्यार्थी तयार होणे अपेक्षित असल्याचे मत पंचायत समिती शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी व्यक्त केले ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दुसऱ्या टप्प्यातील क्षमता वृध्दींगत प्रशिक्षण २.० समारोप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे,सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी नॅन्सी पायस,डेक्कन एज्युकेशनचे डॉ.समीर ओंकार उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या अमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या क्षमता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तयार होण्यासाठी मदत होईल.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे म्हणून ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे जाणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर होत असून कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे विषय नव्याने येत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी सुलभक संदीप क्षीरसागर,प्रदीप देवकाते,शहाजीराजे पवार,राहुल आवारी,मनोज नायकवाडी,संतोष खताळ,प्रा.जितेंद्रकुमार थिटे,बबन गुंड,संतोष क्षीरसागर,राजेंद्र चोरे,आदिनाथ कर्डिले,अशोक कर्डिले,चंद्रशेखर काकडे,रामचंद्र नवले,सचिन भूकन,दशरथ आळवे,प्रशांतकुमार माने,गणेश बांगर,संदीप गोरडे,संजना गावडे,स्नेहा खरबस,संतोष गावडे,बेबी तोडमल,ज्योती जाधव,सारीका चव्हाण,प्राची कुलकर्णी,पी.ए.कुलकर्णी,जयश्री भुजबळ,शरयू कांबळे उपस्थित होते. सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे सुनील भूकन,सचिन थापा,पूनम जाधव यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे यांनी केले तर आभार मनोज धिवार यांनी मानले.