जुन्नर/ ओझर- प्रतिनिधी सचिन थोरवे
अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा. बाळासाहेब कवडे,विश्वस्त विक्रम कवडे,विनायक जाधव,संतोष कवडे,शिल्पाताई जगदाळे यांच्या शुभाहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त प्रतिक होनराव,अभिषेक जोशी,राहुल कदम,ज्योतीराम जाधव,दीपक जोरे,स्वप्नील शिंदे,सिग्न्ध चंद्रा यांना मिळाला .पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता. तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. व येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल stand पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. तसेच पार्किंग तळावरील 100 बाय 200 चे पत्राशेडचा भाविकांनी उपयोग करून घेतला .सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प. अक्षय महाराज बोडके आळे,यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली. आजचे अन्नदाते चिंतामण अनाजी कवडे,ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. दानशूर व्यक्तीमत्व प्रतीभ होनराव यांनी देवस्थान ट्रस्ट ला २१०००/- देणगी दिली.आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त, प्रकाश मांडे , सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे ,विक्रम कवडे, समिर मांडे , विनायक मांडे , संतोष कवडे , विलास कवडे , विनायक जाधव, मंगेश पोखरकर,सौ.शिल्पा जगदाळे, यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.