जुन्नर /ओझर- प्रतिनिधी सचिन थोरवे

महाराष्ट्र मध्ये अनेक सहकारी साखर कारखान्यांचे जाळे असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखाना हा एक महाराष्ट्रातील आदर्शवत साखर कारखाना म्हणून संबोधले जात असल्याने महाराष्ट्रातून लहान मुलांच्या सहली नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कारखान्यांमध्ये गाळप चालू असताना साखर कशाप्रकारे तयार होते ही उत्सुकता खरंतर लहान मुलांमध्ये जास्त असल्यामुळे अनेक शाळेमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक सहलीचे नियोजन करत असतात. उल्हासनगर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 25 येथील स्वामी धर्मदास साहिब विद्यालय येथील 45 विद्यार्थी त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक चार शिक्षक यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक घुले साहेब यांच्या परवानगीने कारखान्यास भेट दिली असून भेटीनंतर कडाळी सर आणि घुले साहेब यांच्यात जुन्या ऋणानुबंधा च्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कारखान्यास भेट दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य त्या ठिकाणी पाहण्यास मिळत होते या सहलीसाठी कार्यकारी संचालक भास्कर घुले सेक्रेटरी अरुण थोरवे त्याचप्रमाणे शेतकी अधिकारी पाटील यांचे देखील सहकार्य मिळाले त्याबद्दल कारखाना प्रशासनाचे शालेय मुख्याध्यापक यांनी आभार मानले असून ही सहल पीएम श्री अंतर्गत आयोजित करण्यात आल्याचे कडाळी सर यांनी सांगितले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button