सरदवाडी प्रतिनिधी – बाळासाहेब जाधव
सरदवाडी ग्रामपंचायत आणि एनव्हलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नोहाव फाउंडेशन यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत माझा कचरा माझी जबाबदारी याविषयी ह भ प संगीता उर्फ गायत्री ताई श्रीपाद कोंडे देशमुख यांची सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. तसेच ताईंनी महिलांना कचऱ्यासंदर्भात सोप्या भाषेत उदाहरण पर दाखले दिले. ताईंना ओंकार घेगडे (तबला वादक) तर माऊली महाराज यांनी हार्मोनियम ची साथ दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व अभिनव विद्यालयाच्या मुलींनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रम प्रसंगी श्री आबासाहेब सरोदे (पंचायत समिती सदस्य )श्री नितीन पाठक सर( एनव्हलियर कंपनी हेड मॅनेजर) सर्व ग्रामपंचायत सदस्य ,कुमार ओहोळ, माजी सरपंच विलास कर्डिले, अण्णापूर गावच्या सरपंच सौ.दीपिका शिंदे ,तृप्ती सरोदे, माजी सरपंच कमलताई सरोदे, मुक्ता पारधे सरदवाडी महिला भजनी मंडळ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.सरदवाडी गावचे आदर्श ग्रामसेवक बाळासाहेब बेंद्रे यांनी सर्वांचे आभार मानले.