सरदवाडी प्रतिनिधी – बाळासाहेब जाधव

माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर होले साहेब व एस आय गायकवाड यांनी सरदवाडी येथे रस्ते सुरक्षा संबंधी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. महामार्ग पोलीस वाहतूक नियमन व वाहतूक केसेस तसेच अपघात घडू नये या संदर्भात वाहतूक नियमन कसे करावे तसेच हेल्मेट चे महत्व व अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये , विनापरवाना वाहन चालू नये यांसारख्या इतर वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी घुले साहेब यांचा सत्कार सरदवाडी गावच्या सरपंच लक्ष्मीताई जाधव व उपसरपंच सोमनाथ सरोदे यांनी केला . सरदवाडी गावचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी आभार मानले

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button