…गोलेगाव येथील निपुन भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद..


प्रतिनिधी… चेतन पडवळ


गोलेगाव ता. १६ गोलेगाव येथील खाऊ गल्ली व आनंद बाजार ठरला चर्चेचा विषय निपुन भारत अभियान अंतर्गत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेगाव आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिरूर तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे गोलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
माझी शाळा….. माझा उपक्रम…
निपुण भारत अंतर्गत आनंद बाजार व खाऊ गल्ली या उपक्रमांतर्गत व्यावहारिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला. शाळेत भाजी बाजार व खाऊ गल्ली उपक्रमातून कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शाळेने केला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातून तसेच खरेदी करून वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. गावच्या इतिहासात असा भाजी बाजार व खाऊ गल्ली उपक्रम प्रथमच भरविला असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा सर्व माल खरेदी केला. आपणही व्यवहार करू शकतो असा आत्मविश्वास मुलांना मिळाला. बाजारातच खरेदी करून नफ्यावर विक्री करण्याचे व्यापारी गणित येथील मुलांनी यशस्वीपणे सोडविण्याचे पाहून आम्ही शिक्षक आनंदित झालो. या उपक्रमाचे उद्घाटन फीत कापून गावचे प्रथम नागरिक सरपंच दिपालीताई तुषार पडवळ यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच निलेशशेठ बांदल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्रशेठ कारंडे, पोलीस पाटील संदीप भोगावडे, पीडीसीसी बँक मॅनेजर शरद भोगावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सीमा वाखारे, सीमा ढेपे, सदस्या पुनम भोगावडे, प्रियंका कु-हाडे, आरती मांढरे, सदस्य गोरक्ष कारंडे, उद्योजक तुषारशेठ पडवळ, नितीन पडवळ, स्वप्निल पडवळ, बबनराव वाखारे, माजी सरपंच राजेंद्र कटके, सरस्वतीताई कटके, तुळशीराम पवार, सचिन कटके, दीपक भोगावडे, अंगद वाखारे, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल वाखारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदिप आढाव मच्छिॅद्र गायकवाड, सोनवणे दीपक मांढरे, दत्ता साळवे, सुहास गोगडे, संदीप कु-हाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“”खाऊ गल्लीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उड्या पडल्या होत्या. वस्तूंच्या विक्रीतून पैसे मिळत असल्याचे पाहून विद्यार्थी हरकून गेले होते. मात्र त्याचबरोबर दहा रुपये कमवण्यासाठी माझा आई-बाबा शेतामध्ये किती राबतो… “” तसेच पदार्थ बनविण्यासाठी आईला किती कष्ट पडत असतील. याची जाणीवही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
सदर उपक्रमातून सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजारांची उलाढाल झाली. या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button