प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
पाबळ,ता.शिरूर जि.पुणे येथील
श्री पद्ममनी जैन श्वेतांबर तीर्थपेढी संचलित श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कूलचा इ.१० चा निकाल १००%लागला असून सलग १३ वर्ष ही निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.

इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले असून त्यांच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे यांनी यावर्षी दहावीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर केला त्यामध्ये
विद्यालयाचा विद्यार्थी शनेश्वर थिटे याने
९२ % गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.अनुक्रमे डफळ संचिता ९१.२०%द्वितीय तर खैरे आर्यन ८८.२०%गुण मिळवून विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक मिळवला तसेच साकोरे आर्यन ८६% व गायकवाड अनुजा ८४.२०% मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.संस्थेचे अध्यक्ष हर्षद गांधी,सुनील राठोड,केतन शहा,जयेश शहा,गिरीश शहा,भूषण गांधी व सर्व संचालक मंडळाने तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केलेले आहे.
परिसरात श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कूल सर्व सुविधायुक्त विद्यालय असून दैनंदिन अभ्यासाबरोबरच अनेक सहशालेय उपक्रम देखील विद्यालयात घेतले जातात त्याचबरोबर ज्यादा तास आणि लीड डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.