जातेगाव बु.( ता. शिरूर): [श्री.संभाजीराजे विद्यालयातील २००२ च्या दहावीच्या वर्गातील स्नेह मेळावा प्रसंगी उपस्थित विद्यार्थी ]
प्रतिनिधी जिजाबाई थिटे
जातेगाव बु ( ता शिरूर )येथील श्री . संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील २००२ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याला तत्कालीन मित्र-मैत्रिणींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.शालेय गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन,सुसंस्कार आणि जीवन करियर विषयक विचार आम्हाला नोकरी व व्यवसाय या दृष्टीने सदैव दिशादर्शक आहेत या भावनेतून तब्बल २५ वर्षांनी माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले.यावेळी शालेय शिक्षण वाटचालीतील आठवणी व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम याबाबत विचार व्यक्त करताना आनंद अश्रू त्यांना थांबविता आले नाहीत.आज वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी,व्यवसाय,गृहिणी,शेती इ. क्षेत्रात स्थिरस्थावर झालेले विद्यार्थी कोकण कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी एकत्र आले.सर्वांनी याप्रसंगी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे हे होते.जेष्ठ शिक्षक सुरेश उमाप, कांतीलाल धुमाळ,शंकर भुजबळ, सुभाष बांगर,रमेश जाधव,मनोहर केवटे,शिक्षिका सुनिता उमाप,राजश्री गावडे,सुरेखाताई गायकवाड,शिक्षकेतर कर्मचारी सुरेश शितोळे,दत्ता करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी विचार व्यक्त करताना प्राचार्य थिटे म्हणाले,”माध्यमिक विभागातील शिक्षण नागरिकत्वाचे संवर्धन करते”याच वयोगटातील संस्कार आणि शैक्षणिक मार्गदर्शन चिरकाल अंतःकरणात कायम राहते.विद्यार्थ्यांनी स्वप्रगती बरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना नजरेसमोर ठेवत वंचित,उपेक्षित,अनाथ,दुर्बल आणि आर्थिकदृष्टया कमकुवत मुला – मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत नवा विचार कायम करावा .स्नेह – मेळाव्यातून विद्यार्थी कल्याणासाठी स्वतंत्र सामाजीक कल्याण समूह स्थापन व्हावा अशी स्नेह-मेळाव्यातून अपेक्षा आहे.वरील आवाहनास अनुसरून मार्जी विद्यार्थी महेश मासळकर याने स्वर्गीय सोमनाथ काळे या वर्गमित्राच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्विकारण्याचे याप्रसंगी जाहीर केले.विद्यालयीन शिक्षणाव्दारे स्थिरस्थावर झालेले विद्यार्थ्यांना या भूमिकेची आठवण रहावी या विचारातून विद्यालयाचे माजी विद्यार्थी आनिल क्षिरसागर,स्वप्निल मासळकर काका राखपसरे,किरण कामठे,छाया पवार,सुनिल उमाप,नवनाथ इंगवले,संतोष मोरे यांनी पुढाकार घेऊन स्नेह मेळाव्याचा योग जुळवून आणला.याबाबत आपल्या इतर सहकाऱ्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हॉटसअप ग्रुप तयार करत एकत्र केले होते.”सद्यस्थितीत विद्यालयीन शैक्षणिक मार्गदर्शनामुळे आमचे करिअर सुकर झाले आहे. जातेगांव येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा निर्माण झाल्याने आम्हीप्रशासन,वैद्यकीय,अभियांत्रिकी,व्यवस्थापन,शेती,तंत्रज्ञान,उद्योग, आरोग्य इ क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे अशी आठवण काही सहकारी वर्गमित्रांनी आवर्जुन सांगून शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला.मनीषा उमाप,कविता पवार,संगीता शिंदे,ज्योती खळदकर,प्रिया निकाळजे,अनिता हंबीर,रूपाली इंगवले,निर्मला उमाप,सारिका मासळकर,जनाबाई मोरे,मोहिनी मासळकर,कविता खळदकर,कविता मासळकर,छाया इंगवले,मनीषा इंगवले,शीला होळकर,बेबी उमाप, सुरेखा पवार,चैत्राली इंगवले,मोहिनी गवारे,शितल बढे,नंदा इंगवले,प्रविण वाढाणे,सचिन पटेकर,रामकृष्ण खळदकर,गणेश मासळकर,गणेश पवार,प्रकाश उमाप,रामभाऊ मोरे, प्रवीण मोरे,सिद्धार्थ पटेकर,महेश मासळकर इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास संस्था अध्यक्ष कांतीलाल उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना फेटा बांधून सन्मानित करणेत आले.माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास वॉटर फिल्टर भेटवस्तू देणगी स्वरूपात दिली . कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला .